श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – शिवरायांनी मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. सतत संघर्ष करीत स्वराज्य निर्माण केले. ४०० वर्षांपूर्वी त्यांच्या वाटेला मोठा संघर्ष आला व त्या संघर्षाला सामोरे गेल्यानेच शिवराय आजही तुमच्या आमच्या हृदयात विराजमान आहेत. शिवराय हे सतराव्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती होते, उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या हयातीत त्यांनी जगातील सर्व प्रमुख योद्ध्यांचा पराभव केला. उत्तम व्यवस्थापन हे शिवरायांच्या यशाचे गमक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गुण आपल्याला हेरता आले पाहिजेत, असे प्रतिपादन व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती निमित्त श्री.शिंदे यांचे हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, अण्णासाहेब वाकडे, विजयकुमार धुमाळ, कृष्णकांत सोनटक्के, बाळासाहेब हापसे, बाळासाहेब राऊत, एक्साईज इन्स्पेक्टर रावते, सब इन्स्पेक्टर पालवे, संतोष परदेशी, बाळासाहेब जाधव, भिकचंद मुठे, बाबासाहेब तांबे, भगीरथ काळे, भारत वैरागर, विलास लबडे, बाळासाहेब बनकर, ज्ञानेश्वर खाडे, दत्तात्रय तुजारे, आदी उपस्थित होते.