श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक कीर्तीचे लोककल्याणकारी राजे होते. महाराजांनी प्रजेच्या हिताला प्रथम प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा.उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष, मा आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या पुण्यतिथी प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ प्रशासकच नव्हे तर ते शूर, पराक्रमी, मुत्सद्दी व उत्तम राजकारणी देखील होते. महाराजांनी सर्वसामान्य रयतेला केंद्रस्थानी ठेवून समाज व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवून आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहावा असे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र होते. यावेळी स्वर्गीय ससाणे साहेबांच्या आठवणींना उपस्थित सहकाऱ्यांनी उजाळा दिला . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व स्व जयंतराव ससाणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मा. नगराध्यक्ष संजय फंड, जि.प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण मा. नगरसेवक रमेश शेठ कोठारी, रमणअण्णा मुथा, सुनील बोलके, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहानी, रितेश रोटे, दत्तात्रय सानप, आशिष धनवटे, मुन्नाभाई पठाण, राजेंद्र सोनवणे, कैलास दुबैया, महंता यादव, जनाकाका जगधने,अरुण मंडलिक,नितीन पिपाडा,सुहास परदेशी, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, श्रीरामपूर शहर काँग्रेस, काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे सहकारी व स्व ससाणे साहेबांवर प्रेम करणारे अनेक सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.