8.8 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

मोदींजीच्या नेतृत्वाखाली समाजातील शेवटच्या माणसाचा विकास : खा. डॉ. सुजय विखे पा. 

नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- जिल्ह्यातील महिला आणि दिव्यांगांच्या विकासासाठी जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या “सबका साथ सबका विकास” धोरणाखाली देशातील समाज घटकातील शेवटच्या माणसाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील केले आहे. ते पारनेर येथील साहित्य वाटप समारंभात बोलत होते. 

पारनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत खा. डॉ. सुयज विखे पाटील यांच्या हस्ते मोफत सहाय्यक साधनांचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिभा लोकसंचित केंद्र पारनेर अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत ग्रामिण स्वयंरोजगार निर्मितीनुसार स्वयंरोजगार विक्री केंद्र, फूड प्रोसेसिंग युनिट,औजारे बँक ,व बचत गटातील महिलांना बँक कर्ज वाटप करण्यात आले.

यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जात आहेत. त्यांच्या नेवृत्वाखाली देश जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे. अशातच देशातील सर्वात शेवटच्या माणसाचा विकास कसा होईल याचा विचार आणि आखणी पंतप्रधान मोदींजी करत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्याणाची कामे होत आहेत. यामुळे मी मोदीजींचे आभार व्यक्त करतो असे डॉ. विखे म्हणाले.

खासदारांनी लोकांना आवाहन करताना सांगितले की, सदरचे वर्ष हे निवडणुकीचे असून अनेक प्रलोभने दिली जातील, पण आपले मतदान करताना आपण सतर्क असले पाहिजे केवळ मोठमोठ्या आश्वासनाला बळी न पडता सुशिक्षित व्यक्तीला मतदान करा असे आवाहन डॉ. विखे यांनी केले.

तर तुमचा पुढील खासदार कसा हवा? आणि कसा नको याचे विश्लेषण करा, यावेळेस तुम्हाला लोकसभेत कोणाला पाठवायचे याचा निर्णय घ्यायचा आहे.

हे करताना तुम्हाला तुमचा खासदार हा वाळू तस्करांना व गुंडांना पोसणारा हवाय की, आणखी कोण हे ठरवावे लागणार आहे. यासाठी तुमच्या मुला- मुलींसमोर या निवडणुकीतील सर्व उमेदवारांचे फोटो ठेवा आणि त्यांना विचारा, ‘तुम्हाला कोणासारखं व्हायचंय’! त्यांनी मी सोडून कोणाच्याही फोटोला हात लावला तर आपण खुशाल त्याला मतदान करा! असे खुले आव्हान खा. डॉ. सुजय विखे पाटील केले तसेच खासदारकीच्या कालावधीत नगर जिल्ह्यासाठी दहा हजार कोटींची कामे केली आहेत.

याप्रसंगी काशिनाथ दाते ,भाजप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे, डॉ भाऊसाहेब खिलारी,बंडू शेट रोहकले, गंणेश शेळके, वसंतराव चेडे,सचिन वराळ,दूध संघाचे अध्यक्ष दता नाना पवार, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पंकज करखिले, लहू भालेकर,ओंकार मावळे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!