spot_img
spot_img

फेडरेशन ऑफ गोल्ड व्हलूयर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.श्रीकांत विठ्ठलराव बेद्रे

जनता आवाज न्यूज

कोल्हार (प्रतिनिधी):- फेडरेशन ऑफ गोल्ड व्हलूयर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.श्रीकांत विठ्ठलराव बेद्रे यांची नियुक्तीचे पत्र आखिल भारतीय सुवर्णकार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. संतोषशेठ वर्मा यांनी त्यांना प्रदान केले .महाराष्ट्र राज्याच्या सराफ व्यवसायातील शिखर विभाग म्हणजे गोल्ड व्हलूयर्स बँकिंग माध्यमातून सोने तारण करताना त्यातील आचारसंहिता,नवनवीन बदल,भावफरक,आधुनिक तांत्रिक पद्धतीने होणारे परीक्षण या सर्व विषयावर राज्यात संघटनेचे कार्य आहे. 

गोल्ड व्हलूयर्स च्या समस्या निराकरण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याचे काम व आर.बी.आय बँकेच्या ध्येय धोरणविषयी उपयोजन करण्याची जबाबदारी संघटनेची आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील उच्च विद्या विभूषित, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील कार्याची दाखल घेऊन सदरची निवड संघटणे मार्फत करण्यात आली आहे. यावेळी फेडरेशन ऑफ गोल्ड व्हलूयर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक संघटक श्री. भैय्याभाऊ भामरे,अध्यक्ष श्री. नचिकेत भूर्के,सेक्रेटरी तेजस ढोंरे,उदयराज पोंदार,लक्ष्मीनारायण वर्मा , वसंतराव विसंप,अड्. गणेश आळदीकर,सी.ए.अमित गाणार आदि उपस्थित होते. 
दरम्यान या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे महसूल,पशुसंवर्धन,दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री मा. नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील,खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत बेद्रे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राज्यातील सर्वात मोठे अधिवेशन अहमदनगर या ठिकाणी भरवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!