नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’ हे ब्रीद घेवून नेप्ती येथील छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये २२ फेब्रुवारी रोजी आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये ५३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले असून विद्यार्थ्यांमध्ये समाजकार्याची भावना जागृत करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी केले.
महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या छत्रपती विचारधारा हा विद्यार्थ्यांचा ग्रुप तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर गुलशन गुप्ता आणि त्यांची टीम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील शाश्वतग्यान या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस. जॉर्ज हे उपस्थित होते. छत्रपती विचारधारा ग्रुप चे विद्यार्थी प्रतिनिधी यश निंबाळकर, तेजस मुंगसे, ओंकार वाळके, वैभव तिडके आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी गिरीश पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रा.ह. दरे साहेब, सचिव मा.श्री. जी.डी.खानदेशे साहेब, सहसचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉक्टर विवेक भापकर साहेब, विश्वस्त ॲड. दीपलक्ष्मी म्हसे मॅडम तसेच संस्था सदस्य-पदाधिकारी या सर्वांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या या रक्तदान शिबिर कार्याचे कौतुक केले.