लोणी दि.२२( जनता आवाज वृत्तसेवा ):-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेत्या सर्वसमावेश युवा आणि शिक्षण धोरणांमुळे तरुणांनासह मुलींना रोजगार आणि स्वयंरोजगार क्षेञात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. औषध निर्माणशास्ञ विभागात मोठी संधी आहे.नोकरी देण्यात आणि स्वयंरोजगारात प्रवरा कायमचं अव्वल असल्याचे सांगत प्रवरेचे माजी विद्यार्थी हे आपले भुषण आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय लोणी येथे पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन तसेच माजी विद्यार्थी मेळावा पालक मेळावा आणि औद्योगिक संस्था परिसंवाद या कार्यक्रमात सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.माजी विद्यार्थी गुफिक लाईफ सायन्सेस असोसिएट उपाध्यक्ष पिनाक पाध्या यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रिन्सिपल सायंटिस्ट ग्लेनमार्क फार्मासिटिकलचे , राहुल आहेर, धीरूभाई अंबानी लाईफ सायन्स मुंबईचे व्यवस्थापक रोहीत बढे,ज्योती पाठक संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, प्रवरा फार्मसी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. बी एम पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर, उपस्थित होते.
सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी विविध स्तरावर मोठ्या पदावरकार्यरत असलेले. विद्यार्थी व त्यांची प्रवरा संस्थेविषयी असलेली आपुलकी हाच आपला अनमोल ठेवा आहे असे सांगून प्रवरा शिक्षण संस्था ही सदैव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व मदतीसाठी सतत मदतीचा हात पुढे करण्यास तत्पर आहे असे सांगितले.
माजी विद्यार्थ्यानी या नावातीलच ताकद आपणाला भविष्यात किती मोलाची ठरते याबद्दल मुलांना त्यांचा अनुभव सांगितला. तसेच नोकरी मिळवण्यासाठी लागणारी तयारी ज्ञान व नोकरीच्या विविध संधी याबद्दल माहिती दिली.
प्रारभी डाॅ.संजय भवर यांनी वार्षिक अहवाल वाचन करत महाविद्यालयांच्या विविध उपक्रमाची माहीती दिली.यावेळी विविध क्षेञातील गुणवंत विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या सन्मान मान्यवरांनी केला.