spot_img
spot_img

टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पठारे कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल

टाकळीभान ( प्रतिनिधी):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे कनिष्ठ महाविद्यालयाचा इ.१० वीचा निकाल – ९९.३७ टक्के लागला आहे.

     

विद्यालयातून कु. दिशा नानासाहेब गिते या विद्यार्थिनीने ९४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.कु.भक्ती गणेश लेलकर या विद्यार्थिनीने ९२. ८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला तर कु. दिव्या जालिंदर कोकणे या विद्यार्थिनीने ,९२.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.

 या परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी १६० विद्यार्थी बसले होते त्यापैकी १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बी .टी.इंगळेपर्यवेक्षक ए.डी. बनसोडे, जेष्ठ शिक्षक व वर्गशिक्षक वैजयंती सोनवणे ए.ए. पाचपिंड तसेच स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक समिती सदस्य, माता – पालक समिती सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!