11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

दुर्गापूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जेरबंद  प्राणी मिञासह नागरीकांची वनविभागास मद्दत

लोणी दि.२३( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथे गुळवे वस्तीवर विहीरीत पडलेल्या साधारण एक ते दीड वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले आहे.

दुर्गापुर येथील दाढ हनुमंतगावं रोड लगत असलेल्या सौ. मंगल रमेश गुळवे यांच्या गट नंबर १६४ मधील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला आणि प्राणीमित्र यांना यश आले. रमेश गुळवे हे आज सकाळी मोटार चालु करण्यासाठी विहिरीवर गेले असता त्यांना पाण्याचा व गुरगुरन्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं असता त्यांना बिबट्या मोटरच्या पाईपचा आधार घेत असलेला दिसला. त्यांनी लगेच पोलिस पाटील दिलीप पुलाटे आणि प्राणीमित्र विकास म्हस्के यांना कळविले. म्हस्के यांनी वनरक्षक प्रतीक गजेवर यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनपाल सानप, वनरक्षक प्रतीक गजेवर, संजय साखरे,प्राणीमित्र विकास म्हस्के, अजय बोधक घटणास्थळी पोहचले आणि क्रेट च्या साहाय्याने बिबट्याला आधार दिला. तातडीने पिंजरा आणून नाड्याच्या साहाय्याने विहीरीत सोडला बिबट्या अलगत पिंजऱ्यात घुसला.यावेळी रमेश गुळवे, शांताराम पुलाटे, माणिक गुळवे , तलाठी कानडे आप्पा व परिसरतील नागरिकांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास मदत केली.

अजूनही एक पिल्लु आणि त्यांची आई परिसरातच आहे.गुळवे वस्तीवर पिंजरा लावावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!