27.9 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

हर्षवर्धन घोगरे यांचे निधन

लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे व कृषीभूषण प्रभावती घोगरे यांचे चिरंजीव हर्षवर्धन जनार्दन घोगरे (वय ३१) यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले.

इंजिनियंअर तसेच एमबीएपर्यंत उच्च शिक्षण घेतलेले हर्षवर्धन घोगरे हे यापूर्वी अमोल डेअरी, मुंबई येथे नोकरीला होते. त्यानंतर सध्या ते मुंबईतील आयसीआयसीआय बँकेत नोकरीला होते. दुपारी जेवणाबरोबर त्यांनी दही खाल्ले.

त्यांना ॲसिडिटीचा त्रासअसल्याने ते झोपल्यानंतर त्यांना उबळ आली. परंतु ही उबळ तोंडावाटे बाहेर येण्याऐवजी श्वासनलिकेत गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. मयत हर्षवर्धन घोगरे हे शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार स्व. चंद्रभान घोगरे यांचे नातू तर एकनाथ घोगरे आणि दत्तात्रय घोगरे यांचे पुतणे तसेच कोल्हारचे माजी सरपंच सुरेंद्र खर्डे, अनिल खर्डे व डॉ. सुनील शंकरनाना खर्डे यांचे भाचे होत. हर्षवर्धन यांच्या अकाली निधनामुळे लोणी खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!