7.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

योजनांच्या अंमलबजावणीतून मतदार संघात सर्व समावेशक विकास  – सौ.विखे पाटील

आश्वी दि.२५( जनता आवाज वृत्तसेवा ):-राजकारणापेक्षा विकासाचा दृष्टीकोन ठेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम शिर्डी मतदार संघात होत आहे.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकास कामांना निधी कमी पडू दिला जात नाही.

योजनांच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीतून सर्वसमावेश विकास होत विकास कामाबरोबरचं वैयक्तीक लाभर्थी योजनेतही हा मतदार संघ आघाडीवर असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पार्टील यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या जवळपास दोन कोटी   किंमतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या भुमीपुजन सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.पद्यश्री विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक नारायण कहार यांच्या अध्येक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास विखे पाटील कारखान्याचे संचालक शांताराम जोरी,अण्णिसाहेब जोशी,सौ.लक्ष्मीबाई कहार,सरपंच सतीश जोशी,मनोहर जोशी,तान्हाजी वाघमारे रमेश जोशी, संजय जोशी,भिमराज बुधे,सुधील जोशी,ज्ञानेश्वर कहार,स्वप्निल अंञे साहेबराव भांड,अमित बनसोडे,रविंद्र दातीर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सौ विखे पाटील म्हणाल्या गोर गोरीब जनता हेच आपले कुंटुंब असून राजकारणा पेक्षाही समाजिक बांधिलकीचे काम करण्यावर भर दिला आहे. गटातटाचे राजकारण न करता जनताभिमुख काम करण्यावर भर दिला आहे.या मतदार संघाचा सर्वसमावेश विकासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काम करतांना विकास कामाबरोबरचं पालकमंञी म्हणून अनेक योजना सुरु केल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर,काश्मीर प्रश्न,महिला शक्तीकरण शेतकरी हिताचे निर्णय घेऊ काम केल्याने देशाची वाटचाल ही प्रगतीकडे राहीली आहे.राज्य गो- सेवा आयोगातून लवकरचं गो शाळासाठी शासनाच्या वतीने मोठी योजना ना.विखे पाटील यांच्या मार्गदर्शाखाली येणार आहे.शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जनतेने ही विकास कामे चांगली होण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगून गावपातळीवर मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे तो निधी परत जाणार नाही ही काळजी घेऊन वेळेत कामे करा. जलजीवन योजनेतून होणारी कामे चांगली करा.वेळेत काम पुर्ण करा.प्रत्येकाला पाणी मिळेल ही काळजी घ्या अन्यथा आमच्या रोषाला समोरे जावे लागले असा इशारा ही सौ.विखे पाटील ठेकेदारांना देतंनाच ही कामे वारंवार होणार नाही चांगले कामे करा असे सांगितले.

प्रारंभी शांताराम जोरी यांनी विविध योजनेतून दाढ खुर्दचा विकास होत असल्याचे सांगिलले यावेळी नारायण कहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हात बुधवार पासून सुरु होणा-या महारोजगार मेळाव्यात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सौ.विखे पाटील यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!