कोळपेवाडी(जनता आवाज वृत्तसेवा ) :-.दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडेचा प्रश्न विधानसभेत मांडला व त्याबाबत पाठपुरावा केल्यामुळे दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिले. मतदार संघातील इतर गावांप्रमाणे तुमच्या परिसरात देखील रस्त्यांचे जाळे निर्माण करू शकलो.एम.आय.डी.सी. तुमच्या लगत होणार असल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.शासनाच्या लाभाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. हे सर्व साध्य सुजाण मतदारांनी संधी दिल्यामुळे व मतदार संघातील जनता पाठीशी उभी राहिल्यामुळे शक्य झाले आहे. दिलेली आश्वासने पूर्ण होत असली तरी मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी यापुढेही पाठीशी रहा असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी बहादरपुर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.
कोपरगाव मतदार संघातील बहादरपूर येथे महिला बचत गट भवन इमारत भुमिपूजन जलसंधारण अंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन, बहादरपूर-जवळके रस्त्यावरील पुलाच्या नूतनीकरण कामाचे उद्घाटन,जलजीवन अंतर्गत पाण्याची टाकी कामाचे उद्घाटन,चोंडी वस्ती अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण,सांडपाणी संकलन कामाचे उद्घाटन,कचरा संकलन घंटागाडीचे लोकार्पण, सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाचे लोकार्पण, सार्वजनिक ठिकाणी आडाची दुरुस्ती व धोबीघाट कामाचे उद्घाटन, ग्रामपंचायत संगणकृत कामाचे लोकार्पण, गावांतर्गत हायमॅक्स बसविणे कामाचे उद्घाटन,गावठाणु व संत रोहिदासनगर विज पुरवठा कामाचे उद्घाटन,संत रोहिदासनगर मध्ये प्लेव्हर ब्लॉक बसविणे,रमाई माता नगर मध्ये रस्ता मजबुतीकरण करणे, जि.प.प्राथमिक शाळा बैठक बँच वितरण सोहळा,समाज कल्याण अंतर्गत लेडीज सायकल व कडबा कुट्टी साहित्याचे वितरण, शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण तसेच बहादराबाद व जवळके येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील विरोधी पक्षाचे आमदार असतांना आपल्या वैयक्तिक हितसंबंधातून मतदार संघाचा विकास केला आहे. त्यांच्यामुळेच काकडी विमान तळ होवून परिसराचा विकास होण्यास मदत झाली. त्या चाळीस वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा निधी मतदार संघाच्या विकासासाठी या सडे चार वर्षात आणू शकलो याचे समाधान आहे.परंतु आपल्याला आजूनही विकासाचा पल्ला गाठायचा आहे अजून विकास करायचा आहे. त्यासाठी यापुढील काळातही मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी आपले पाठबळ आवश्यक असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.
याप्रसंगी पद्मविभूषण डॉ.शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक बाबुराव थोरात,सरपंच गोपीनाथ रहाणे, उपसरपंच रामनाथ पाडेकर, साहेबराव रहाणे, दत्तात्रय खकाळे, शिवाजी रहाणे, प्रशांत रहाणे, भाऊसाहेब रहाणे, नानासाहेब पाडेकर, गोपीनाथ खकाळे, आप्पासाहेब पाडेकर, साईनाथ रहाणे,बाबासाहेब रहाणे, रामनाथ रहाणे, रंगनाथ गव्हाणे,साहेबराव खकाळे, आण्णा रहाणे, कचेश्वर रहाणे, संदीप जोरवेकर, विलास पाडेकर,भिकचंद रहाणे, बाळासाहेब रहाणे, बाळासाहेब पाडेकर, नानासाहेब पाडेकर, वैभव सोनवणे, अमोल पाडेकर, सोमनाथ रहाणे, साईराम रहाणे, विजय कोटकर, बाळासाहेब रहाणे, चित्राताई रहाणे, खंडेराव खकाळे, निवृत्ती रहाणे, जगन बोरसे, प्रभाकर रहाणे, सुनील रहाणे, नारायण रहाणे, योगेश सोनवणे, पुंजाहरी रहाणे, एकनाथ बोरसे, कौसर सय्यद, वामन रहाणे, राजेंद्र औताडे,विठ्ठल सोनवणे, नंदकिशोर औताडे, किशोर राहणे, विजय राहणे, बहादराबाद येथे गोकुळ पाचोरे, शिवाजी पाचोरे, देवराम पाचोरे, मोहनराव पाचोरे, प्रमोद पाचोरे,संदीप पाचोरे, प्रदीप पाचोरे, राजेंद्र पाचोरे,पोपट पाचोरे, शिवाजी भोसले, शशिकांत पोकळे, नरहरी पाचोरे, अरुण पाचोरे, गणपत पाचोरे, उत्तमराव पाचोरे, बाळासाहेब पाचोरे, लक्ष्मणराव थोरात,भास्कर थोरात, चंद्रकांत पोकळे,रावसाहेब थोरात, नवनाथ पोकळे, गोरक्षनाथ वाकचौरे,दत्तात्रय थोरात, आप्पासाहेब थोरात, भाऊसाहेब वाकचौरे, रामनाथ वाकचौरे, महेश थोरात, माऊली थोरात, गोरक्षनाथ थोरात,बंडोपंत थोरात, ज्ञानेश्वर वाघ, गजानन मते, अनिल वाणी, दिलीप जुंधारे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोटी आश्वासन द्यायची हे आमच्या रक्तात नाही. जी कामे होवू शकतात तीच आश्वासन द्यायची व ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावायचे. चाळीस वर्षात ज्यांच्याकडे सत्ता होती. राज्यात व केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार होते मात्र त्या चाळीस वर्षात होवू शकला नाही एवढा विकास या चार वर्षात झाला आहे.