23.8 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांचे निधन

कोळपेवाडी( जनता आवाज वृत्तसेवा): – कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांचे एकनिष्ठ विश्वासू सहकारी माधवराव आबाजी खिलारी यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवाशी व प्रगतिशील शेतकरी असा नावलौकिक असणारे माधवराव खिलारी आप्पा या नावाने धामोरीसह पंचक्रोशीत परिचित होते. धामोरी गावचे माजी सरपंच, कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद देखील त्यांनी भूषविले असून अशा अनेक पदांवर काम करतांना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.

सर्वांशी आपुलकीने बोलणारे माधवराव खिलारी हे अभ्यासू व्यक्तिमत्व व उत्तम वक्ते होते. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यापासून त्यांचे काळे कुटुंबाशी स्नेहबंध जोडलेले होते. काळे कुटुंबाशी नेहमी एकनिष्ठ राहिलेले माधवराव खिलारी अतिशय समजूतदार, संयमी व समाधानी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनामुळे धामोरीसह तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देखील कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका हुशार व एकनिष्ठ कार्यकर्त्याला मुकला आहे अशा शब्दात माजी आमदार अशोकराव काळे यांनी शोक व्यक्त केला आहे. आ.आशुतोष काळे यांनी देखील खिलारी यांच्या निधनामुळे कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला वरिष्ठ कार्यकर्ता हरपला असल्याचे म्हटले असून दु:ख व्यक्त केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!