पारनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-मस्तिष्क व मन यांची विद्यार्थ्यांनी सांगड घालून स्वतः मधील सुप्त गुणांना वाव देउन भविष्यातील करियर घडविण्यासाठी जिवाचे रान केले पाहिजे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे, श्री गोरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मॉडेल व्हिलेज गोरेगाव. या विद्यालयातील, इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एस. एस. सी. बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा व निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी प्रमुख पाहुणे व्याख्याते प्रा. अमोल सायंबर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, आपण कोणत्याही वयात आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. त्यासाठी चांगली स्वप्ने पहा आणि प्रयत्न करा. आपल्यातील सुप्त गुण वेळीच ओळखा. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. मैदानावरील खेळ खेळा. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त रहाल. आळस नावाचा नाग, आपल्या छातीवर बसला आहे. त्याला वेळीच झटकून टाका. नाहीतर तो आपल्याला संपविल्याशिवाय राहणार नाही. प्रा. सायंबर यांनी आपल्या व्याख्यानांमधून आपल्या शालेय जीवनातील अनेक प्रसंग व अनुभव सांगून विद्यार्थ्यांना जवळजवळ दिड तास मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सुरेश जावळे होते. तर प्रमुख अतिथीमध्ये, प्रा. अमोल सायंबर, प्राचार्य सुनील वाव्हळ, मॉडेल व्हिलेज गोरेगावच्या सरपंच सौ. सुमनताई तांबे, प्रा. श्री. शिवाजी नरसाळे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस, विद्यालयाचे सा.शास्त्र शिक्षक निलेश जासूद सर, यांनी प्रास्ताविक व अध्यक्ष निवड केली. सौ. सुजाता नरसाळे यांनी अध्यक्षिय निवडीस अनुमोदन दिले. कलाशिक्षक मंगेश काळे सर, यांनी पाहुण्यांचा विस्तृत परिचय करून दिला. विद्यालयातील गोरेश्वर गीतमंचातील मुलींनी स्वागतगीत सादर केले. विद्यालयातर्फे सर्व अतिथींचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचा सत्कार करण्यात आला.
गोरेगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. सुमनबाई तांबे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले की, या विद्यालयाची निकालाची परंपरा चांगली आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थी शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनिअर, झाले आहेत. या पुढील काळात या विद्यालयाचे विद्यार्थी शासकीय अधिकारी व्हावेत. ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे, श्री ढोकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य, सुनील वाव्हळ, प्रा. शिवाजी नरसाळे,. कमल औटी,ज्योती वाघ या सर्वांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना सांगितले की, इयत्ता दहावी प्रमाणेच आपणास यापुढील काळातही अनेक परीक्षांना सामोरे जायचे आहे. तरी कुठल्याही प्रकारचे दडपण व भिती मनात न ठेवता परीक्षेला सामोरे जा. निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारचे यश मिळेल. विद्यार्थ्यांपैकी कु. आरती तांबे, प्राजक्ता शिंदे, दिव्या नरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावर्षीच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी संस्था व शाळेसाठी 25 हजार रुपयांची देणगी दिली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन देण्याची परंपरा ही कायम ठेवली. विद्यालयाचे प्राचार्य सुरेश जावळे, यांचे मार्गदर्शन व इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक कैलास खिलारी व बाळासाहेब खिलारी यांच्या नियोजनामुळेच कार्यक्रम अतिशय सुंदर झाल्याचे व्याख्याते,अमोल सायंबर यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सुरेश वैरागर, प्रा.राजेंद्र लोंढे. किरण उमाप, अनुपमा सोबले, संजय मारवाडे,दत्तात्रय नरसाळे,सुरेखा सुंबे,मंजुषा शिंदे,प्रिया डव्हणे,. आनंदा काकडे,अनिता तांबे, सुखदेव थोरात,अनिता थोरात व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दीक्षा घंगाळे, कु. पायल व्यवहारे व बाळासाहेब खिलारी सर, यांनी केले तर संध्या खिलारी यांनी आभार मानले.