संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):–हिंदू समाजाची नाळ ओळखून गरज भागविणारे या जगात अभावानेच मिळत असतात.. हिंदू धर्माच्या अडचणी सोडवि ण्यासाठी काम केले पाहिजे चांगल्यागोष्टी सभोवताली निर्माण होत असतात. मंदिरे हे खरे ज्ञानपीठ आणि विद्यापीठ आहेत. त्यामुळे देव देवतांच्या मंदिरातूनच खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला संस्काराचे धडे मंदिरात मधूनच मिळत असतात असे गौरवोद्गार. देवगड देवस्थान मंदिर ट्रस्टचे महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
संगमनेर येथील क-हे घाटात संगम सेवाभावी ट्रस्ट डॉ भानुदास व वकील श्रीराज डेरे परिवाराच्या संकल्पनेतून साकारलेल्या भक्ती शक्ती मंदिरात विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्तात्रय महाराज शिवमंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तसेच भक्ती शक्तीचे प्रतीक शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांच्या प्रतीकाचा शुभारंभ महंत भास्करगिरी महाराजांच्या शुभहस्ते करण्यात आला . त्यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर हिंदुत्व वादी नेते सुरेश चव्हाणके, खा सदाशिव लोखंडे अकोलेचे आ किरण लाहामटे ,कोपरगावच्या माजी आ स्नेहलता कोल्हे, आचार्य महामंडलेश्वर डॉ रामकृष्णदास महाराज लहवीतकर ,आळंदीच्या जोग वारकरी शिक्षण संस्थेचे उद्धव महाराज मंडलिक सूर्यवंशी ,नारायण महाराज जाधव, महंत डॉ रत्नाकर पवारउद्धव महाराज मंडलिक योगी केशवगिरी महा राज गीता परिवाराचे अध्यक्ष डॉ संजय मालपाणी डॉ श्रीराज डेरे अंकिता डेरे डॉ जगदीश वाबळे डॉ एकता डेरे दिपक महाराज देशमुख, सुनील महाराज मंगळापुरकर, सुदाम महाराज कोकणे, सखाराम महाराज तांगडे राम महाराज पवळकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महंत भास्करगिरी महाराज पुढे म्हणाले कीअयोध्यातील श्रीराममंदिर निर्मितीमध्ये विद्यमान शासन आणि साधुसंतांच्याकृपा शीर्वादाने श्रीरामाचे मंदिर उभारणी झाली ज्याप्रमाणे अयोधयेतील प्रभू श्रीरामांच्या मंदिरा झाले.आणि या मंदिराच्याउभारणी मुळे पाचशे वर्षाचा कलंक पुसला गेला ही हिंदू समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
‘ मं ‘म्हणजे मंगल , ‘ दि’ म्हणजे दिव्य, तर ‘र’ म्हणजे रम्यता ही तीन तत्वे.मंदिरातून मिळत आहे मंदिरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल त्यासाठी मंदिरे फायद्याची आहे. डॉ. भानुदास डेरे यांनी संस्काराचा डेरा उभा केला आहे. रुग्ण सेवा ही देवाची पूजा आहे केली आणि संस्कृती संस्काराचा दर्जा वाढला पाहिजे. आपण बेसावध राहिलो.परंतु श्रद्धाकोणा लाही तोडता आली नाही असे सांगत मंदिर हे जिवंत श्रध्दाचे प्रतीक आहे. आजूबाजूला भूर्णहत्या, गोहत्या, वाढत चालल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने सावध राहण्याचा सल्ला देत समाजाचे दुःख नष्ट व्हावे अशी भावना त्यांनी आपल्या मनो गतनातून व्यक्त केली.
हिंदुत्ववादी नेते सुरेश चव्हाणके म्हणाले सध्या हिंदू समाजबांधव मंदिराला विसरत चालला आहे.हल्ली मंदिर बांधणारे भेटत नाही.मंदिरे हिंदू धर्माची शक्ती केंद्र होती.
पूर्वी राजाचे राजवाडे नव्हे तर आततायी पणा करत काही विघनसंतोषीनी ल मंदिरे तोडली. कळस हा ऊर्जा आहे. धर्माच्या व्यवस्थेचे काम मंदिरातून चालते. अध्या त्मिक सामाजिक संदेश मंदिरातून देता येतो. त्यामुळे आपला हिंदू धर्म वाचवि ण्यासाठी हिंदू समाज बांधवांनी एकत्र यावे. आता देव आणि संत वेगवेळ्या जातीमध्ये वाटले गेले आहेत. मंदिरात अर्थशास्त्र दडले आहे. पूर्वी मंदिरे ही बँक होती. आत्महत्या थांबवण्यासाठी मंदिर निर्माणा होणे काळाची गरज असल्याचे यावेळी खा सदाशिव लोखंडे, अकोलेचे आ किरण लहामटे, डॉ. संजय मालपाणी थोर विचारवंत सोपानराव देशमुख उद्धव महाराज मंडलिक यानी मनोगत व्यक्त केले. तर उद्धव महाराज सूर्यवंशी यांनी कीर्तनातून उपस्थितांमध्ये प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट महाराज आगलावे यांनी केले स्वागत संगम सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ भानुदास डेरे यांनी केले तर आभार ॲड. श्रीराज डेरे यांनी मांडले