लोणी दि.२६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर येथे पार पडलेल्या महासंस्कृती आणि कृषी महोत्सवात लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाने सहभाग घेतला. यामध्ये कृषी महाविद्यालयाच्या उद्यान विद्या विभागाने वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांची , फळझाडांची तसेच औषधी वनस्पतींची विक्री करण्याचा प्रयत्न केला.त्याच बरोबर दुग्धशास्त्र विभागाने सुमारे दहा ते बारा प्रकारच्या वेगवेगळ्या दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, पेढा ,खवा, व्हे ड्रिंक , लस्सी, मठ्ठा, गुलाबजाम इ . पदार्थांची तसेच कीटक शास्त्र विभागाने जैविक कीटकनाशके आणि सेंद्रिय खते यांची विक्री करण्याचा प्रयत्न केला.
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने वेगवेगळ्या वनस्पतींच्या उती संवर्धनाचे रोपे, अळंबी उत्पादने विक्रीचा प्रयत्न केला .यावेळी अंतिम वर्षातील विद्यार्थी ज्ञानेश्वर थोरात , नेताजी शिंदे , हर्षद हांगे , पल्लवी शिंदे , चेतना जाधव, प्रशांत कोल्हे , सूरज घोलप ,सचिन दाभाडे औदुंबर झिंजूकेॅ, शुभम मोहिजे यांनी सहभाग नोंदवला.
या विद्यार्थ्यांना कृषी आणि कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल बेंद्रे, कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विशाल केदारी, डाॅ.रमेश जाधव, डॉ.उदय पाटील, प्रा. विशाखा देवकर , प्रा. स्वरांजली गाढे , डॉ. सारिका साबळे , प्रा. परिमल विखे, श्री हर्षवर्धन मगर यांचे मार्गदर्शन लाभले.