spot_img
spot_img

नाशिक ते भगवान गड या नवीन बस सेवेचा श्रीरामपूर येथे मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने स्वागत

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- नाशिक-भगवान गड या नवीन शिवशाही बसला मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे वतीने डेपो मँनेजर श्री.कासार व गोकुळ गायकवाड यांचे हसते नारळ वाढवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी फाउंडेशनचे सचिव ऋषिकेश मोरगे पाटील म्हणाले की, शिवशाही बस राष्ट्रीय जयंती उत्सव समिती वंजारी समाज यांचे प्रयत्नाने सुरु झाली. सदरची बस दररोज असून नाशिक-सिन्नर-निमोण-लोणी-श्रीरामपूर-नेवासा-पाथर्डी-भगवान गड असा बसचा प्रवास आहे. या बससेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीरामपूर डेपो मँनेजर कासार व समितीचे सचिव तुकाराम सांगळे यांनी केले आहे.

यावेळी बस चालक एस. बी. चोले यांचा सत्कार ऋषिकेश मोरगे, वाहक एस. पी. जाधव यांचा सत्कार शरद नवले तर समितीचे सचिव तुकाराम सांगळे यांचा सत्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोरगे यांनी केला. यावेळी बसला मोरगे पाटील बहुउद्देशीय फाऊंडेशनचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मोरगे यांनी शुभेच्छा दिल्या. बस सेवा सुरु करणेकरीता अथक प्रयत्न करणारे तुकाराम सांगळे व पदाधिकारी यांना धन्यवाद देऊन हया शुभारंभ सोहळ्यास सर्वश्री गायकवाड, अनील भागवत, श्रीरामपूर डेपोचे अधिकारी, समितीचे निमंत्रक अध्यक्ष शशिकांत घुगे, कार्य अध्यक्ष नामदेव सानप, खजिनदार शामराव गिते, तसेच उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष मायाताई बुरकुल, वैशाली कराड, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख कैलास कराड (नाशिक) आणि समितीचे सर्व पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!