spot_img
spot_img

कोल्हार भगवतीपूर येथे उर्स शरीफ उत्साहात संपन्न

कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार भगवतीपूर येथे हजरत रोशनशाहवलीबाबा यांचा उर्स शरीफ उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने सवाद्य संदल तर बुधवारी ‘हबीब अजमेरी’ यांच्या कव्वालीच्या कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती कमेटीचे अध्यक्ष मुन्ना उर्फ मुदस्सर शेख यांनी दिली.

कोल्हार भगवतीपूर येथील रोशनशाहवलीबाबा दर्गाह उर्स कमेटीच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उर्स शरीफ मधील कार्यक्रमाचे हे सलग ४थे वर्ष असून सलाबाद प्रमाणे याहीवेळी वरील कार्यक्रम उत्साहात पार पडले.

दोन दिवस झालेल्या या उर्स शरीफ निमित्ताने मंगळवारी बस स्थानक आवारात सायंकाळी वाजतगाजत संदल पार पडला. बुधवारी रात्री बाजारतळावर भव्य कव्वालीचा कार्यक्रम संपन्न झाला. कव्वालीच्या शुभारंभ प्रसंगी कोल्हार भगवतीपुर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे, पद्मश्री विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, पत्रकार संजय कोळसे, माजी विश्वस्त श्रीकांत खर्डे, प्रदीप गाडेकर तसेच असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोशनशाहवली बाबा दर्गाह उर्स कमिटीचे अध्यक्ष मुन्ना उर्फ मुदस्सर शेख, सदस्य कय्युम शेख, अन्सार पिंजारी, असिफ शेख, आसिर पठाण, तोसिफ पठाण, बबलू पिंजारी, मतीन पिंजारी, बबलू खाटीक, अज्जू पठाण, साहिल तांडेल, सरफराज टकारी, साहिल शेख आदी प्रयत्नशील होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!