7.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

जयहिंदच्या वतीने ६१ कर्तुत्वान महिलांचा सन्मान जाणीव फाउंडेशनचा नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-  देशाच्या राज्याच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे योगदान महिला भगिनींची असून त्यांचा प्रत्येक कुटुंबात सन्मान झाला पाहिजे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात यांनी केले असून संगमनेर शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 61 महिलांचा जयहिंद नारी शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृह येथे जयहिंद महिला मंच व जाणीव फाउंडेशन यांच्या वतीने नारीशक्ती सन्मान सोहळा 2024 संपन्न झाला .यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात , जयहिंद महिला मंचच्या संस्थापक सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, डॉ श्रद्धा वाणी, सौ प्रमिला कर्डिले , सौ मायाताई पवार, सौ दीप्तीताई सांगळे, डॉ दिपाली पानसरे, सौ मंगलताई काकड , ॲड .उदय ढोमसे ,प्रा बाबा खरात , ॲड सीमाताई सातपुते, ॲड अशोक हजारे ,अंतोन मिसाळ, ॲड रश्मी मिसाळ , नूर मोहम्मद शेख, सौ पुनम भोर, निकिता हेंद्रे, सुवर्णाताई गोरडे ,स्नेहल आडांगले ,सौ सविता यादव ,सौ भारती चोपडे, सौ शिल्पाताई ढोमसे आदी. पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ कांचनताई थोरात म्हणाल्या की, देशाच्या आणि प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीत स्त्रियांचे योगदान आहे. राजमाता जिजाऊ, इंदिरा गांधी, मदर तेरेसा ,क्रांतीज्योती सावित्री फुले, अशा स्त्रियांचा वारसा महिलांना लाभला आहे. शिक्षणामुळे प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहे .या पुढील काळातही सर्वांनी कुटुंबाच्या प्रगती बरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असे आवाहन केले.

तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर मध्ये अनेक कर्तुत्वान महिला आहेत. शहरातील अनेक स्त्रियांनी अत्यंत कष्टातून आपले कुटुंब उभे केले आहे. अनेक महिलांनी मोठ्या दुःखातून सावरत मुलेबाळे मोठी करून या कुटुंबांना सन्मान मिळवून दिला आहे कायम पडद्यामागे असणाऱ्या या स्त्रियांचा सन्मान होणे ही महिला दिनाच्या निमित्त आनंददायी बाब असल्याचे त्या म्हणाल्या

कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, ग्रामीण भागात महिला खूप कष्ट करतात .मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात .चांगल्या कामाची कौतुकाची थाप प्रत्येक महिलेने उंच मानेने स्वीकारली पाहिजे. महिलांमध्ये आरोग्य बाबत जागृती होणे गरजेचे असून कोणताही आजार असला तर तातडीने तपासणी करून घ्या. कॅन्सर हा पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे बरा होतो. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातही बरा होऊ शकतो .मात्र काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपला परिसर हिरव्या पाल्या भाज्यांचा आणि गुळ शेंगदाण्याचा आहे. आहार चांगला असेल तर शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणही वाढते. म्हणून महिलांनी चांगला आहार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ दुर्गाताई तांबे यांनी केले सूत्रसंचालन निलेश पर्वत यांनी केले तर अंतोन मिसाळ यांनी आभार मानले. यावेळी महिला व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते

नारीशक्ती पुरस्कारार्थी महिला

सौ ताराबाई वामन, वर्षा भोंडे, योगिता कडव ,सुप्रिया गायकर ,सौ लताताई मुर्तडक, जुलेखा शेख ,सौ संगीता बाळासाहेब देशमाने, सौ ताराबाई अशोक हजारे ,सौ प्रमिला रमेश खेमनर ,सौ शारदा गोरख करपे, सौ कविता सूर्यवंशी पवार, ऋतुजा मानकर, सिंधू गायकवाड, कमल काकडे ,ज्योती दारोळे ,नाजनीम शेख, जमुना राक्षे, अनारबाई कन्हैयालाल कतारी, रेखा पंजाबी, मंदा पाटोळे, सौदामिनी कानोरे, नूर जहा तांबोळी,सौ प्रमिला रामनाथ अभंग ,कल्पना देवेंद्र ओहरा, छाया दिघे, राणीताई वाजे, आशा वाकचौरे, ॲड शुभांगी घुले, डॉ अर्चना गोरे, उषा क्षीरसागर, सुशीला पाटणकर, शुभदा मुळे, सुजाता सांगळे, सोनाली गायकवाड ,वैशाली आडेप ,सुनिता पापडेजा ,निर्मला टोकसे, स्मिता गुने, रूपाली तिवारी, फातिमा मोमीन, सीमा चौबे, आसावरी मुळे, शोभा कोळपकर, जयश्री काळंग, चंद्रकला भोईर, जागृती कळसकर, रजनी पाथरकर, सुरेखा दुधे ,नम्रता नितीन ओझा, सुनीता वावळ ,उज्वला कलंत्री, राधाबाई गोसावी, पार्वतीबाई पवार, अशालता पारख, योगिता शिंदे, संगीता खरात, शीला वाकचौरे, पार्वतीबाई होलम या साठ महिलांना सन्मानचिन्ह शाल बुके व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!