कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार येथील व्यापारी संकुलात भर दुपारी गाडीच्या डिक्कीतून एक लाख ३२ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मयूर प्रभाकर उर्फ बाळूकाका खर्डे याने आयडीबीआय बँकेत ८ तोळे सोने ठेऊन ३ लाख १० हजाराचे गोल्डलोन घेतले. त्यानंतर महावितरण वीज कंपनीचे सुमारे एक लाख बिल भरले. सोबत एस बँकेचे ७५ हजार कर्जावरील व्याज भरले. व उर्वरित १ लाख ३२ हजारांची रोख रक्कम मोटारसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवली.
त्यानंतर मयूर यास भूक लागल्याने कुंकूलोळ संकुलातील स्टेट बँकेलगत असलेल्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबला व समोर दुचाकी उभी केले. दरम्यानच्या काळात सदर मोटारसायकलच्या डिक्कीतून अज्ञात व्यक्तीने संधी साधत रोख रक्कम लंपास केली. उर्वरित रक्कम द्राक्ष बाग मजुरांना देण्यासाठी ठेवली होती असे प्रभाकर खर्डे यांनी सांगितले. सदरची चोरी ही पाळत ठेऊनच केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. घटनेच्या ठिकानावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून याबाबत लोणी पोलिसात गुन्हा दाखल केला करण्यात आला. स्टेट बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये सदरची चोरी कैद झाली असण्याची शक्यता आहे. पुढील तपास लोणीचे सपोनि कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. दिनकर चव्हाण करीत आहेत.