spot_img
spot_img

सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

लोणी दि.२९ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मोहू चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व टेली कम्युनिकेशन या विभागातील दहा विद्यार्थ्यांची हिंदुस्तान नॅशनल ग्लास आणि इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड झाल्याची माहीती प्राचार्य डाॅ. जी.बी शिंदे यांनी दिली.  
   

गुणवत्ता पुर्ण शिक्षणांसोबत विविध करिअर मार्गदर्शक मेळाव्यामुळे या ठिकाणी परिपुर्ण विद्यार्थी घडविला जातो.वेळोवेळी तंञज्ञानात होणारे बद्दल,कंपन्यांची गरज आणि विविध कंपन्याबरोबर करार,माजी विद्यार्थ्याचे मार्गदर्शन यामुळे शिक्षणांसोबत नोकरीची संधी मुलांना मिळत असून नोकरी उपलब्ध करुन देण्यात प्रवरा नेहमी अव्वल स्थानावर राहीली आहे.
विद्यार्थ्यानाडाॅ.सोमनाथलव्हाटे,डाॅ.दिपक चांडे, प्रा. विजय कडलग, प्रा. अर्चना हटकर, प्रा. नदीम शेख,प्रा,प्रकाश पाटील प्रा.राजेंद्र बेलकर,यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना .राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, चिंचोली कॅम्पच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुष्मिता विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,
 प्राचार्य डाॅ.जी.बी.शिंदे,प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. राजेंद्र बिडकर आदींनी अभिनंदन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!