28.1 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना एक जण अत्यवस्थ

शेवगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- शेवगाव गेवराई महामार्गावर तळणी गावाजवळ एका हॉटेल जवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गुन्ह्यामध्ये एकाच अटक केली आहे.

सविस्तर घटना असे की काल सायंकाळी चार वाजता येथील शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेल जवळ जुन्या तळणी रस्त्यावर गोळीबार झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडल्याची वार्ता वाऱ्या सारखी पसरली होती. यावेळी या घटनेत नेमका गोळीबार कोणी केला???, कोणावर केला, ??? यातील आरोपी कोण याबाबत अधिक माहिती उपलब्ध नसल्याने पोलीस देखील संभ्रमावस्थेत होते. यासंदर्भत पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. ताब्यात घेतलेल्या इसमाची पोलीस सखोल चौकशी करीत आहेत.

सदर घटनेची हकीकत अशी की, शहरातील शेवगाव – गेवराई रस्त्यावर दोन दुचाक्यावर आलेल्या चार इसमापैकी एकाने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. मात्र या गोळीबारात कोणी ही जखमी झाले नाही. गोळीबारानंतर दुचाकीवर आलेले गेवराईकडे जात असतांना बाभुळगावफाटा येथे एक दुचाकीला मागून धडक दिल्याने एक जण जखमी झाला. तर ज्याच्यावर गोळीबार केला त्याच्या हाताला जखम झाल्याने दोघांना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.तेथे एक कट्टा पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आंतरवाली ता. शेवगाव येथील सुरेश उर्फ पिन्या कापसे हा एका स्कार्पिओमध्ये गेवराई रस्त्यावर गर्जे वस्ती शेजारी रसवंती गृहाजवळ थांबलेला होता. आज रविवार ता.३ रोजी दुपारी २ च्या दरम्यान दोन दुचाकीवरुन चौघे तेथे येवून थांबले. त्यातील एकाने कापसे याच्यावर गोळीबार केला. मात्र त्यामध्ये तो बचावल. यानंतर दुचाकीवर आलेले चौघे गेवराईकडे वेगाने निघून गेले. कापसे यान स्कार्पियोतुन त्यांचा पाठलाग केला. बाभुळगाव फाटा येथे त्याने एका दुचाकीला मागून धडक दिल्याने त्यावरील दोघे खाली पडले आणी कापसे व त्यांच्यात चकमक झाली. यामध्ये कापसेसह दोघे जखमी झाले दोघांना उपचारासाठी पाठवून दिले. तर एका जणाला ताब्यात घेतले. सर्व आरोपी हे पुणे व यवतमाळ येथील असल्याचे कळते. हा हल्ला कोणत्या कारणावरुन झाला हे मात्र समजले नाही.

पोलीस यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार या घटनेतील एका जखमीला नगर येथे उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या तो अत्यावस्थेत असल्याने त्याचा जबाब घेता आला नाही { पुढील उपचारासाठी त्याला पुण्याला हलविल्याची माहिती आहे }असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्याची प्रकृती खालावल्याने त्या जखलीला पुण्याला हलविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली.

तर दुसऱ्याला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले की, या घटनेतील अत्यावस्थेत असलेल्या इसमाचे नावं अर्जुन पवार असून त्याच्या जखमी साथीदार राकेश राठोड हे दोघे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील आहेत. या घटनेशी संबंधित पुण्यातील दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत .

शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे हे सुट्टीवर असल्याने पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील हे शेवगाव पोलिस ठाण्यात ठाण मांडून आहेत.

या घटनेप्रकरणी तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शेवगाव दंगली पासून कायमच वादग्रस्त घटनांसाठी कुप्रसिद्ध झाले आहे शेजारच्या नेवासा तालुक्यातून राजरोसपणे हत्यारांची खरेदी केली जाते काही तरुण आपल्या कमरेला घाव तर काही गावठी कट्टे लावून हिंडताना दिसत आहे पोलीस प्रशासन याकडे सोयीस्कर रित्या डोळे झाक करताना दिसत आहे गुप्त खाबऱ्यामार्फत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली असताना सुद्धा कारवाई मात्र शून्य होताना दिसत आहे.

ज्यांना अजून मिश्या सुद्धा फुटले नाहीत दुधाचे दात सुद्धा पडले नाहीत अशा नमुन्यांकडे शहरात आणि तालुक्यात सुद्धा गावठी कट्टा???

अविनाश देशमुख

(सामाजिक कार्यकर्ते)

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!