4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

एकविराच्या वतीने ८ मार्च रोजी भव्य मोफत महिला आरोग्य शिबिर महिला टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसह रस्सीखेच आणि बॅडमिंटन स्पर्धा ही होणार

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):-काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या एकविरा फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त संगमनेर मध्ये भव्य मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च व 9 मार्च रोजी 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तज्ञ स्री रोग तज्ञ व कॅन्सर तज्ञ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मोफत महिला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महिलांची विविध तपासणी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास एसएमबीटी क्लिनिकच्या माध्यमातूनही तपासण्या व उपचार केले जाणार आहेत.

महिला दिनानिमित्त एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षापासून सातत्याने विविध उपक्रमांची आयोजन केले असून यावर्षीही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

महिला टेनिस बॉल क्रिकेटसाठी संगमनेर तालुक्यातील 51 संघांनी आपली नोंदणी केली असून रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे 44 व 31 संघांनी नाव नोंदणी केली आहे.

या स्पर्धेत प्रथम बक्षीस 7777 द्वितीय बक्षीस 5555 तर तृतीय बक्षीस 3333 रुपये सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

महिला दिनानिमित्त होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात मा. आ.डॉ. सुधीर तांबे ,

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, सामाजिक कार्यकर्त्या सौ. कांचनताई थोरात, नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे ,सौ.शरयू ताई देशमुख आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

या स्पर्धेतील प्रवेशासाठी 7057 037037 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात व एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!