राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे महसूलमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पाठपुराव्यामुळे सुमारे 6 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला.
येथे ना.विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाची सत्ता असून ग्रामपंचायतीच्या माध्यामातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.
जलजीवन मिशन अंतर्गत साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या सुमारे 5 कोटी रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन लोणी जिल्हा परिषद गटातील व पिंपरी निर्मळ येथील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गाव अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, हायमास्ट दिवे,
सार्वजनिक स्वच्छतागृह, ग्रामपंचायत सभागृह,काँक्रिटीकरण, शाळा डिजिटल संच,व्यायाम साहित्य,इलेक्ट्रिक ट्रांसफॉर्मर,अशा सुमारे 6 कोटी रुपयांच्या कामाचा उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
ना.राधाकृष्ण विखे पाटील, खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना यावेळी उपसरपंच श्री. महेश वाघे यांनी व्यक्त केली.
यावेळी लोणी येथील विखे पाटील कारखान्याच्या संचालक बाळासाहेब आहेर, कारभारी आहेर, दादासाहेब घोगरे, बॅंकेचे संचालक सुधीर आहेर, राज्य कुक्कुटपालन समितीचे धनंजय आहेर,भारत घोगरे,सरपंच पूनम कांबळे, विश्वनाथ निर्मळ, एन टी निर्मळ,विष्णु घोरपडे,भानुदास निर्मळ,अप्पासाहेब घोरपडे, योगेश निर्मळ, उपसरपंच महेश वाघे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ आदि पदाधिकारी उपस्थित होते.