17.6 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

सर्वांना सोबत घेवून सर्वच घटकांचा विकास साधला – आ. आशुतोष काळे कोकमठाणमध्ये ९५ लक्ष निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा ): – माझ्यावर मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी देतांना सर्वच घटकांना माझ्याकडून विकासाची अपेक्षा होती. माझ्यासाठी समाजातील प्रत्येक घटक महत्वाचा असल्यामुळे सर्वच समाज घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून सर्वांना सोबत घेऊन सर्वच घटकांचा विकास साधला असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे ५० लक्ष रुपये निधीतून श्री लक्ष्मीआई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, २५ लक्ष रुपये निधीतून तलाठी कार्यालय इमारत बांधकाम करणे, १० लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिर ते समाजमंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे व १० लक्ष रुपये निधीतून श्री मारुती मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसवणे अशा एकूण ९५ लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, मतदार संघातील जनतेला विकासाचे दाखविलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मागील साडे चार वर्षात मतदार संघातील प्रत्येक गावाला व प्रत्येक समाज घटकापर्यंत विकास पोहोचविण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्यामुळे रस्ते, आरोग्य,पाणी आदी मूलभूत विकासाचे प्रश्न सुटले आहेत.मतदार संघातील सर्व रस्ते विकसित झाल्यामुळे मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. तीर्थक्षेत्र विकासाबरोबरच आरोग्याचे प्रश्न देखील मार्गी लागले आहेत. मतदार संघाचा सर्वांगीण विकास एवढे एकच उदिष्ट्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत असतांना निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करून मतदार संघाचा विकास साधला आहे. जनतेला अपेक्षित असलेला विकास या साडे चार वर्षात झाला असून यापुढील काळात उर्वरित जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न देखील मार्गी लागणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गौतम बँकेचे संचालक विजयराव रक्ताटे, गोदावरी खोरेचे संचालक विजयराव थोरात,जिनिंग प्रेसिंगचे संचालक महेश लोंढे, सरपंच उषाताई दुशिंग, दादासाहेब साबळे, विजय पंढरीनाथ रक्ताटे, प्रकाश देशमुख, आप्पासाहेब लोहकणे, अमोल हाडोळे, सोमनाथ महाजन, भाऊसाहेब काशीद, सुनील लोंढे, दिपक रोहोम, भाऊसाहेब फटांगरे, विशाल शितोळे, अविनाश निकम, अनंत रक्ताटे, संभाजीराव देशमुख, संजय देशमुख, सोपान काशिद, दिनकर रोहोम, विशाल जाधव, ज्ञानेश्वर रक्ताटे, जावेद सय्यद, बंटी सय्यद, वाल्मिक दैने, लक्ष्मण जाधव, संदीप धिवर, अरुण दैने, परसराम रक्ताटे, किरण रोहोम, शामराव लोहकणे, मतीन सय्यद, नंदू गायकवाड, ललित धोंडे, एकनाथ दुशिंग, शिवाजी कानडे, भास्करराव लोहकणे, सतिश रक्ताटे, विठ्ठल मोरे, शौकत सय्यद, काकासाहेब काशिद, राजेंद्र रोहोम, फिरोज सय्यद, सिकंदर सय्यद, संदीप रक्ताटे, भाऊसाहेब रक्ताटे, बाबुराव देठे, उत्तम हाडोळे, दत्तू हाडोळे, वैभव रक्ताटे, अनु सय्यद, यासिन सय्यद, सुभाष रक्ताटे, आदिनाथ फटांगरे, संतोष लोंढे, वाल्मिक कापे, कचेश्वर गायकवाड, दिलावर सय्यद, प्रभाकर धिवर, विलास आव्हाड, अशोक टेके, श्रीकांत गायकवाड, रायबाज सय्यद, विकास रोहोम, अमोल खांडगे, शंकरराव गायकवाड, शरद फटांगरे, संतोष धिवर, रवींद्र गायकवाड, दिपक रक्ताटे, रवींद्र बर्डे, सार्वजनिक बांधकाम अभियंता रवींद्र वाकचौरे, राऊत, पंचायत समितीचे जगताप, तलाठी पराड, ग्रामसेवक सुर्वे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!