लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- लोणी बु. येथील लोणी बस स्थानक शेजारी अरिहंत इलेक्ट्रॉनिक्स या दुकानास सकाळी १०:३० च्या दरम्यान भीषण आग लागली.
इलेक्ट्रॉनिक दुकानातून धुराचे लोळ बाहेर येताना दिसत असतानाच आसपास परिसरातील लोकांनी तत्परता दाखवत तातडीने अग्निशामक व पोलीस स्टेशनला फोन केला. इलेक्ट्रॉनिक्स दुकान असल्यामुळे आगीने प्रचंड रुद्ररूप धारण केले. त्यामुळे आगीचे प्रमाण वाढले आसपास परिसरात धुराचे लोळ दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे गाडी घटनास्थळी दाखल झाली. परंतु आगीचे प्रमाण जास्त असल्यामुळे राहता नगरपालिकेची अग्निशामक बोलवण्यात आली. आगीचे स्वरूप जास्त असल्यामुळे जेसीबीच्या साह्याने दुकानाचे शटर तोडण्यात आले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
यावेळी आगीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे पूर्ण साहित्य जळाले. या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये इन्व्हर्टर, टीव्ही या प्रकारचे विक्री व रिपेरिंग चे काम केले जात होते. या दुकानात आग कशामुळे लागली हे अद्यापि कळू शकले नाही. या आगी मध्ये दुकानदार पंकज देवीचंद भंडारी दुकानाचे सर्व सामान जळून खाक झाले त्याचबरोबर संसार उपयोगी वस्तू ही जळून खाक झाले आहेत. या आगीमध्ये सुमारे कितीचे नुकसान झाले हे पण अद्याप कळू शकली नाही.