टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील कृषी मंडळ अधिकारी कार्यालयाचे तारेचे कुंपण तोडुन अनाधिकृतपणे जागा बळकावून दुकान गाळे बांधण्याच्या तयारीत असलेल्या तीन ग्रामपंचायत सदस्यांसह ईतर पाच गाळा माफियांना विरोध करणारे उपसरपंच व त्यांचे समर्थक यांच्यात आतिक्रमणावरुन काल दिनांक ५ मार्च रोजी हाणामारी झाल्याने या दोन्ही गटांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत.
येथील कृषी मंडळ कार्यालयाच्या जागेत तीन ग्रामपंचायत सदस्य व इतर दोघे यांनी कार्यालयाचे तारेचे कुंपण तोडून आनाधिकृतपणे दुकान गाळे बांधकाम सुरु असल्याची माहीती विद्यमान उपसरपंच कान्हा खडागळे यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत या जागेत होत असलेल्या अतिक्रमणास विरोध करुन काम बंद पाडले. यावेळी अतिक्रमण करणारे सदस्य व उपसरपंच समर्थकात तुफान बाचाबाची होवून त्याचे रुपांतर थेट हणामारीत झाले होते. या हाणा मारीत सदस्य सुनिल बोडखे यांना जबरदस्त मारहाण झाली. या मारहाणीत उपसरपंच समर्थक विजय मैड यांनाही दुखापत झाली होती. हाणा मारीत सुनिल बोडखे यांची शुगर लेवल वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याबाबत दोन्ही गटाकडून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत. सदस्य सुनिल तुकाराम बोडखे यांनी उपसरपंच संतोष अशोक खडागळे, विजय किशोर मैड, विठ्ठल पुंजाहरी जाधव, सनि जाधव, संकेत गायकवाड व इतर चार ते पाच व्यक्तींच्या विरोधात हाणमार केल्याची जिवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दाखल केली आहे. तर विजय किशोर मैड यांनी दाखल केलेल्या फिर्यादित सुनिल तुकाराम बोडखे, मिलिंद उर्फ बिल्ला सुनिल बोडखे, तुषार अनिल बोडखे, सोमा पवार सर्व रहाणार टाकळीभान, सागर ( पुर्ण नाव माहीत नाही ) रा. खोकर ता श्रीरामपूर यांच्या विरोधात शिवीगाळ करून दगड फेकून मारून जखमी केल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास टाकळीभान दुरक्षेत्राचे पो. हे. काॕ. त्रिभुवन हे करीत आहेत.