संस्थेच्या विश्वस्त आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रेरणेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. गजानन मांढरे सर होते. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यासंदर्भात मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रा. राजू मोरे यांनी मार्गदर्शन करून जीवनाचे नवीन आयाम आणि जीवन जगण्याची मार्ग आणि मैत्रीचे महत्त्व सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून आपल्या आठवणी आणि आनंद द्विगणित केला या उपक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. सविता गीते आणि प्रा. रवि डांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. गोकुळ चव्हाण प्रा. गोरडे प्रा. रूपाली मन्तोडे , ग्रंथपाल डॉ. अनिल पवार यावेळी उपस्थित होते. सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रवरेच्या बी.एड. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा एका तपानतंर दिला आठवणींना उजाळा.
लोणी दि.२८( प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोणी येथे सन २०११- १२ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याप्रसंगी एकूण ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रम घेऊन या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुरकणे यांनी केले.



