4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

मालमत्ता कर वेळेत भरा; अन्यथा कायदेशीर कारवाई पारनेरचे नगरपंचायत मुख्याधिकारी विनय शिपाई यांचा इशारा

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ):-पारनेर नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कराची मोठ्या प्रमाणावर मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे संबंधित मालमत्ताधारकांनी थकीत थकबाकी त्वरित भरावी असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा संबंधित मालमत्ता धारकावर रीतसर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी विनय शिपाई यांनी दिली.

पारनेर नगरपंचायतच्या वतीने २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणीपट्टी कराच्या वसुलीसाठी शिपाई यांचे मार्गदर्शनाखाली विशेष वसुली मोहीम सूरू करण्यात आली आहे. कार्यालय अधीक्षक माधव गाजरे, कर निरीक्षक लिंबाजी कोकरे, लेखापाल विजय मोरस्कर या अधिकारी व कर्मचारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.जे थकबाकीदार मालमत्ता व पाणीपट्टी भरणा करणार नाही अशा थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रा प्रसिद्ध करणे या सह कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

नागरिकांनी कर भरण्यासाठी गैरसाई होऊ नये यासाठी शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील नगरपंचायत वसुली विभाग सर्व सूरू राहणार आहे. तरी थकबाकीदारांनी कराची रक्कम भरून होणारे संभाव्य कार्यवाही टाळावी व नगरपंचायत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी शिपाई यांनी केले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!