11.9 C
New York
Thursday, October 30, 2025

Buy now

spot_img
spot_img

आ. थोरात यांच्यामुळेच तळेगाव बिरोबा देवस्थान साठी ५ कोटी रु. निधी

तळेगाव दिघे ( जनता आवाज वृत्तसेवा ):–काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमधून तळेगाव दिघे येथील श्रद्धास्थान असलेले बिरोबा देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास अंतर्गत योजनेतून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर मंजूर निधी व वर्क ऑर्डरला स्टे देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले असून देवाच्या कामातही राजकारण केले असल्याची टीका जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी केली आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या देवस्थानच्या कामांबाबत अधिक माहिती देताना महेंद्र गोडगे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या कामाला गती देण्यासाठी मोठा निधी मिळवला त्यांच्यामुळेच कालवे पूर्ण झाले असून तळेगाव भागात डाव्या कालव्याद्वारे पाणी आले आहे.

याच काळात तालुक्यातील विविध रस्ते मोठ मोठे विकास कामे यासाठी ही निधी मिळवला. याचबरोबर पर्यटन विकास योजनेअंतर्गत देवस्थानांच्या विकास कामांसाठी निधी मिळवला .यामधूनच तळेगाव दिघे येथील बिरोबा देवस्थान सुशोभीकरण व विविध विकास कामांच्या करता 5 कोटी रुपये आणि धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थानच्या विविध विकास कामांकरिता 5 कोटी रुपये असा निधी मिळवला.

या कामाची प्रशासकीय मान्यता 31 जानेवारी 2022 रोजी मिळाली आहे मात्र जुलैमध्ये सत्तांतर झाले आणि नव्याने आलेले सरकार आणि पालकमंत्री यांनी या कामांना स्थगिती दिली. ही स्थगिती फक्त राजकारणासाठी असून सामान्य जनतेची पळवणूक होऊ नये याकरता हायकोर्टातून महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या व विद्यमान सरकारने स्थगिती दिलेल्या कामांचा स्टे उठवला. सदर कामाला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आता नव्याने सुरुवात होणार असून या सुशोभीकरणामुळे बिरोबा देवस्थान व परिसरात अधिक सुंदर होणार असून हे मोठे पर्यटन स्थळ व भाविकांचे श्रद्धास्थान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवस्थानच्या कामातही राजकारण

खरे तर भाजप आहे धार्मिकतेचे राजकारण करत आहे. मात्र संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी आमदार थोरात यांनी मिळवलेल्या निधी वर्क ऑर्डर ला स्टे देऊन भाजपा व पालकमंत्री यांनी देवस्थानच्या कामातही राजकारण केले आहे असल्याची टीका शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी केली आहे

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!