spot_img
spot_img

राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रवराॲग्री बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा रोहित वाकचौरे तृतीय

लोणी दि.७( जनता आवाज वृत्तसेवा ):-नुकत्याच शेवगाव येथे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कै सिंधुताई एकनाथराव विखे पाटील स्मृती करंडक राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट चा विद्यार्थी रोहित राजेंद्र वाकचौरे याने तृतीय क्रमांक पटकाविला.

या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये राज्यभरातून अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यापूर्वी देखील रोहित वाकचौरे यांनी अनेक वाद विवाद आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून अनेक पारितोषिके मिळविलेली आहेत. या यशाबद्दल रोहित याला प्रवरा कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे, संचालक डॉ उत्तमराव कदम यांच्या शुभहस्ते तसेच ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ अनिल बेंद्रे, सांस्कृतिक विभागाच्या सारिका फरगडे यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, डॉ. प्रदीप दिघे, एग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. विशाल केदारी, फूड टेक्नॉलॉजीच्या प्रा. चंद्रकला सोनवणे, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट चे डॉ आशिष क्षीरसागर, डॉ काजल खंडागळे, प्रा संतोष वर्पे, प्रा राहुल विखे, प्रा सत्यन खर्डे, प्रा प्रेरणा अभंग, प्रा अश्विनी घाडगे, प्रा शुभम मुसमाडे यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!