spot_img
spot_img

गुणवत्ता पूर्ण शिक्षणा सोबतचं नोकरीची ही उपलब्धी हाच प्रवरा शैक्षणिक संस्थेचा प्रयत्न सौ.शालीनीताई विखे पाटील प्रवरेच्या अभियांञिकीच्या २४९ विद्यार्थ्याची नोकरीसाठी निवड

लोणी दि.२७( प्रतिनिधी):-गुणवत्ता पूर्ण शिक्षणा सोबतचं नोकरीची ही उपलब्धी हाच प्रवरा शैक्षणिक संस्थेचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी अनुभव घेत पुढे जावे. विद्यार्थ्याना शिक्षणातून चांगल्या नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी संस्था कायमचं पुढे राहील्याने आज पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा विशेष आनंद आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
   

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथील या शैक्षणिक वर्षात विविध विभागातील २४९ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्या मध्ये निवड आल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतांना सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संशोधक डॉ. हरीष शिंदे, संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, डीन प्रा.शकील शेख, रजिस्ट्रार डॉ. लक्ष्मण अभंग, प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. अण्णासाहेब वराडे,सर्व विभाग प्रमुख, सर्व विभागांचे प्लेसमेंट अधिकारी,आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, पुस्तकी ज्ञानांपेक्षा अनुभवी ज्ञान विद्यार्थी घेत पुढे जावे. सर्वसामान्य शेतकऱ्याची मुले-मुली आज उच्च शिक्षणातून पुढे जात आहेत. प्रवरेची मुले देश-विदेशात कार्यरत आहे यांचा मोठा अभिमान आहे. असे सांगुन प्रवरा परिवार आणि विखे पाटील परीवार कायम आपल्या सोबत राहील हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना दिला.
 प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने म्हणाले बदलत्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करत प्रवरेतून शिक्षण देण्यावर भर राहीला आहे. विविध सेवा-सुविध माजी विद्यार्थी संघटन, विविध कंपन्याबरोबर शैक्षणिक करार आणि वेळोवेळी विविध करीअर मार्गदर्शन त्याच बरोबर संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दुरदृष्टीने प्रवरेच्या अभियांत्रिकीची प्लेसमेंटमध्ये मोठी आघाडी राहीली आहे. सूत्रसंचालन वरिष्ठ प्राध्यापिका वर्षा गायकवाड यांनी केले.
 यावर्षी महाविद्यालयातील २४९ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाली आहे तसेच काही विद्यार्थ्यांना एकाहून अधिक कंपन्यांमध्ये महाविद्यालयाने नोकरी मिळवून दिली आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!