म्हैसगांव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी तालुक्यामधील म्हैसगांव मध्ये जागतिक महिला दिन व गुण गौरव सन्मान साहळा उत्साहामध्ये साजरा करण्यात आला .
महिला लोकनियुक्त सरपंच सौ सुजता अरुण पवार ,उपसरपंच श्री शशिकांत गागरे , ग्रामसेवक श्री एच बी पारधे , यांनी सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालण तसेच नियोजन केले होते यावेळी म्हैसगांव श्री केदारेश्वर देवस्थान चे माननिय ह .भ.प . पांचाळ महाराज देवस्थान ट्रस्ट हे उपस्थित होते . त्याच्या हस्ते म्हैसगांव येथिल सर्व क्षेत्रातिल आपली उत्कृष्ठ कामागिरी पार पाडणाऱ्या महिलांचा गुण गौरव सोहळा पार पडला.
त्यावेळी सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला या वेळी माजी महिला सरपंच सौ . रुपाली दुधाट , सदस्य भिमा दुधाट , सी .आर . पी . स्नेहा रविंद्र गोसावी , नम्रता नंदकुमार कुटे , ग्राम संघ अध्यक्ष सौ आशा तुकाराम नेहे , संगिता गोरख आग्रे , सर्व गटाचे अध्यक्ष व सचिव , अंगणवाडी सेविका , मदतनीस , आरोग्य विभाग , आशा सेविका, सोसायटी सदस्य ,ग्रामपंचायत कर्मचारी व महिला व पुरुष सामील झाले होते . यावेळी सरपंच सुजाता पवार व अध्यक्ष आशा तुकाराम नेहे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ग्रामपंचायत कडून या सर्व महिलांना शाल , पुष्पगुच्छ ,श्रीफळ देऊन सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला यावर सर्व महिलांनी हसून साजरा करून आभार मानले .