संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आठ दिवस उलटून गेले तरी उपोषण कर्त्याकडे महसूल व जलसंपदा विभागा च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी थेट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत उपोषण करता गेल्यावर तुम्ही येथे येता का ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी नाही त्या ठिकाणी पिण्याचे पाणी देण्याचे काम शासनाचे आणि प्रशासनाचे आहे त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्या असे खडे बोल सूनवत आठ दिवसा पासून सुरू असणारे जांबुतचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांचे आमरण उपोषण आ थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन सोडण्यात आले.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील जांबुत येथे मुळा नदीचे पाणी, शिंदोडी पर्यंत सोडण्यात यावे या मागणीसाठी जांबुत चे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.आठ दिवस आमरण उपोषण सुरू होऊन सुद्धा महसुल व जलसंपदा विभागाचे अधिकारी फिरकले नाही त्यामुळे दिवसेंदिवस डोंगरे यांची प्रकृती खालावत चालली होती. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी थेट जांबुत तिथे जाऊन उपोषणकर्त्याशी चर्चा केली आणि डोंगरे यांना लिंबू पाणी देऊन त्यांचे आमरण उपोषण सोडण्यात आले.
यावेळी संतप्त झालेल्या माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात यांनी थेट जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत चांगलेच खडे बोल सुनावले आणि महसूल आणि जलसंपदा विभागाच्याअधिका ऱ्यांना धारेवर घरात त्यांच्यावर चांगलेच तोंड सुख घेतले.८ दिवस उलटूनही उपोषणकर्त्या कडे कोणत्याही अधिकाऱ्याने साधे डोकून सुद्धा पाहिले नाही. तो गेल्यावर तुम्ही येथे येता का असे खडे बोल काँग्रेस जेष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.
संगमनेर तालुक्यात शेजारच्या मतदार संघातून जाणून बुजून त्रास दिला जात आहे. पिंपळगाव खांड धरणाचे पाणी सोडण्याचा आधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे मात्र त्यांच्यावर पालकमंत्री दबाव आणत असल्याचाही गंभीर आरोप यावेळी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोधक यांचे नाव न घेता केला.सत्ता येते आणि जाते हे चक्र सतत फिरत राहते तेव्हा कुणीही सत्तेचे ताम्रपट घेऊन आलेले नाही तेव्हा सत्तेची मस्ती करु नका असे खडे बोल काँग्रेस नेते आ बाळासाहेब थोरात यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
आपण काठावरील मताधिक्य मिळवून अकोले मतदारसंघातून निवडून आला आहात तेव्हा पाणी सोडू न देण्याची भाषा करु नका असेही माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटेंना यांना ही खडेबोल सुनावले यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समवेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर माजी जिल्हा परिषद सदस्य मीराताई शेटे यांच्यासह पठार भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते