लोणी दि.९ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कवी कुलगुरू कालिदास- संस्कृत विद्यापीठ (रामटेक) नागपूर विस्तार सेवा मंडळ द्वारा रविकीर्ती संस्कृत अध्ययन केंद्र सांगली राज्यस्तरीय -संस्कृत प्रतिभा शोध परीक्षा २०२३-२४ जिल्हास्तरीय परीक्षेत प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या दोन विद्यार्थ्यीनीनी जिल्ह्यात प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत प्रवरा कन्या मंदिरच्या एकूण ३२ विद्यार्थ्यीनींचा समावेश होता, सर्व विद्यार्थ्यीनीनी उत्तम गुण प्राप्त करून पास झाल्या आहेत. त्यामध्ये घवघवीत यश मिळवून अक्षरा नामदेव आघाडे या विद्यार्थ्यीनीने नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. व्याकरण परीक्षेत तिला ७६ गुण प्राप्त झाले . तर मयुरी नितीन बारगर हीचा नगर जिल्ह्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला. व्याकरण परीक्षेत तिला ७० गुण मिळाले.
या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झालेली आहे.तसेच समवशरण जुबिलंट फाउंडेशन भाषा ऑलींपियाड परीक्षा बारामती यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या आठवीच्या ८१ विद्यार्थ्यीनींनी सहभाग नोंदवला. तर नववीच्या ४१ विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेतला , इयत्ता दहावीच्या चौदा विद्यार्थ्यीनींचा सहभाग घेतला यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यीनींनी चांगली गुणवत्ता दाखवत यश संपादन केले. त्यापैकी आठ विद्यार्थ्यीनींना तीनशे रुपये रोख व गोल्ड मेडल प्राप्त झाले.तर १४ विद्यार्थ्यीनीना गोल्ड मेडल प्राप्त झाले.८ विद्यार्थ्यीनींना सिल्वर मेडल प्राप्त झाले.१० विद्यार्थ्यीनीना ब्राँझ मेडल प्राप्त झाले. अशा सर्व विद्यार्थीनीनी सहभाग घेतलेल्या विविध परीक्षांमध्ये सर्वच विद्यार्थ्यीनी उत्तम गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांना संस्कृत विषयाच्या अध्यापिका- सौ निशाली शेजुळ यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे विशेष अभिनंदन संस्था संचालिका सौ एल बी सरोदे , प्राचार्या सौ भारती कुमकर यांनी व इतर सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर वृंद ,पालकांनी कौतुक व अभिनंदन केले.