8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

जागतिक महिला दिनानिमित्त सोनईत कर्तुत्वान १७ महिलांचा सन्मान शारदाताई फाऊंडेशनचा पुढाकार.

सोनई ( जनता आवाज वृत्तसेवा ):- शारदाताई फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सोनईतील १७ कर्तुत्वान महिलांचा सन्मान माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते सोनई सोसायटी हॉलमध्ये शनिवारी करण्यात आला.धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन या १७ महिलांचा फेटा बांधून व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सुनिताताई गडाख यांनी सांगितले की पुढच्या पिढीला प्रोत्साहन म्हणून व या सत्कारमूर्ती महिलांचे काम सर्वांना दाखवण्यासाठी हा सन्मान केला असुन महिलांसाठी सोनई परिसरात जास्त प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले.

उदयन गडाख यांनी महिलांनी स्वतः बचत करून खर्च करण्यासाठी आर्थिक स्वतंत्र होणे गरजेचे असल्याचे सांगत आर्थिक नियोजन करण्याचे सांगितले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी युवा नेते उदयन गडाख, उषाताई सुनिल गडाख, डॉ निवेदिता उदयन गडाख, डॉ. बाबासाहेब शिरसाट, पत्रकार विनायक दरंदले, पत्रकार सुनिल दरंदले, अंजली महामेर, सविता दरंदले उपस्थित होते. सन्मान मूर्ती वच्छलाताई लिपाणे, कमलताई शेलार, द्वारका भाभी कुमावत, डॉ. रजनी शिरसाठ, डॉ. रंजना बेल्हेकर, उषा दीदी, हिराबाई दरंदले, आशाताई कर्डिले, रजिया भाभी, इरफान भाभी, शुभांगी बडे, सुनीता कुसळकर, मंजुषा गडाख, कीर्ती बंग, सोनल लोढा, सीताबाई वैरागर या १७ महिलांचा सन्मान करण्यात आला. बचत गटाच्या महिलांच्या हस्ते केक कापण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघ यांनी केले.

शारदाताई फाऊंडेशनच्यावतीने महिला दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला याचा मनाला मोठा आनंद लाभला आहे या सत्काराने समाजासाठी काम करण्याची ऊर्जा मिळाली. – डॉ रजनी शिरसाठ. पुरस्कार मुर्ती 

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!