सोनई (जनता आवाज वृत्तसेवा):- महिलाच्या आरोग्याच्या बाबतीत मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल आणि सुरक्षित पद्धतींबद्दल कशी काळजी घ्यावी, तळागाळातील महिलाना यांची अधिक माहिती व्हावी, यांचे महत्त्व लक्षात घेऊन किडस किंगडम स्कुलने मुळा कारखाना स्थळावर ऊस तोड़णी महिलाना सुरक्षा म्हणून स्रॅनटरी पॅडचे वाटप मुख्यध्यापिका कीर्ति बंग यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्य स्वछ ठेवणे याची माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे . म्हणूनच, लहानपणापासूनच मासिक पाळीबद्दल वाढलेले ज्ञान सुरक्षित पद्धतींद्वारे लाखो स्त्रियांच्या वेदना कमी करण्यात मदत करू शकते.
किड्स किंग्डम अकॅडमी तर्फे गरजू (ऊस तोडणी कामगार) मुलींना तसेच महिलांना २५० सॅनिटरी नॅपकिन्सचे पॅकेट वाटप करण्यात आले. यासाठी मुख्याध्यापिका महिला शिक्षिका अमिषा बंब ,अश्विनी वरघट ,गौरी , राणी झोजे, काजल कसबे,श, जयश्री वाणी, पायल बंग, प्रतीक्षा मचे यांनी त्यांना मासिक पाळी बद्दल विशिष्ट असे मार्गदर्शन केले.