spot_img
spot_img

साई निर्माण संकुलातील निकालाची परंपरा कायम

शिर्डी (प्रतिनिधी ):-शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या शिर्डीतील साई निर्माण शैक्षणिक संकुलातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संकुलाचे प्राचार्य गणेश डांगे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश प्राप्त केले आहे.

साई निर्माण ज्युनिअर कॉलेज मधील कॉमर्स शाखेत प्रतीक सुदाम मढे याने ८४ टक्के मिळवय प्रथम क्रमांक, दिव्या सुदाम कोते ८२.६७ टक्के मिळवत दुतीय तसेच सानिका बाबासाहेब भोसले हिने ८२.५० टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला असून शाखेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने कॉलेजची शान वाढली आहे . आर्ट शाखेत शुभम हरी रॉयणे ७५.८३ टक्के मिळवत प्रथम क्रमांक, फिरदोस असिफ शेख ७५.३३ टक्के मिळवत दुतीय ऋतुराज विलास आसने ७०.३३ टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे . तसेच सायन्स शाखेत खुशी प्रभात खुशवाह ने ६५ टक्के मिळवत प्रथम क्रमांक, अनुष्का दिलीप गमे ६४.१७ टक्के मिळवत दुतीय क्रमांक , अमन अन्सार इनामदार ६०.३३ टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकवला आहे . 

विद्यार्थ्यांची ज्ञान लालसा केंद्रभूत मानून प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अभ्यासपूर्ण मांडणी केल्याने कॉलेज मधील सर्वच विद्यार्थ्यांना जवळपास सर्वच विषयांना भरीव गुण प्राप्त झाले आहेत. नावीन्यपूर्ण बेसिक घटकांवर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी पूरक अभ्यास पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विद्यार्थ्याना हे यश संपादन करता आले आहे, असे प्राचार्य गणेश डांगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले.
साई निर्माण सांमुळाचे अध्यक्ष विजय कोते, व उपाध्यक्षा ताराचंद कोते यांनी सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून शिर्डी पंचक्रोशीतूनही नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.संकुलातीचे प्राचार्य गणेश डांगे, कॉर्डिनेटर प्रसाद डांगे, शीतल कोते, नितीन डांगे, नितीन गमे, तनुजा वाणी, अनिल शिंदे, काजल राहणे या शिक्षकांचे मार्गदर्शन यशस्वी विद्यार्थ्यांना लाभले आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!