प्रत्येक इमारतीत किंवा जागेत गेल्यानंतर त्या जागेच्या आकार, रंगसंगती इत्यादीमुळे त्या जागेत एक विशिष्ट प्रकारची भावना निर्माण होते आणि हा भावनात्मक संबंध त्या जागेला अधिक कार्यक्षम आणि चैतन्यशील बनवतो ह्या सिद्धांताला लक्षात घेऊन झालेल्या स्पर्धेत लोणीच्या पाच विद्यार्थी नी यश संपादन केले अशी माहीती प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांनी दिली.
लोणीच्या आर्किटेक्चर महाविद्यालयातीचे नवरस स्पर्धेत यश
लोणी दि.२६ (प्रतिनिधी):-नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऑफ आर्किटेक्चर (NASA) ने६५ व्या राष्ट्रीय नवरस स्पर्धेचे आयोजन केले होते. ही भारतातील सर्व आर्किटेक्चर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली राष्ट्रीय स्पर्धा होती.
लोणीच्या आर्किटेक्चर
महाविद्यालयातीच्या विद्यार्थ्यांनी अद्भुत, शृंगार, करुणा, हास्य,विभत्स, रुद्र शांत, वीर, भयानक या नवरसांपैकी एक रस आणि वास्तुकला यांच्यातील परस्परसंबंध दाखवणारा लघुपट तयार करायचा होता. या स्पर्धेत झोन-३ अंतर्गत येणाऱ्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे लोणी येथील प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवरसांपैकी भयानक (भीती ) हा रस घेऊन लघुपट तयार केला व स्पेशल मेन्शन ही ट्रॉफी पटकावली. या स्पर्धेत ओंकार नेरकर, मुकुल घरटे, अनुज रबाडे, रितेश देशमुख यांच्यासह युनिट सचिव यशराज देशमुख या ५ विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल महाविद्यालयातील प्राचार्या आर्कि. तेजश्री ठाणगावकर यांच्यासोबत लघुपट निर्मितीत त्यांना सतत मार्गदर्शन करणारे आर्कि. प्रदीप देशमुख व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सतत प्रोत्साहन दिल्याबद्दल नासाचे समन्वयक तुषार पारिसे आणि महाविद्यालयीन कर्मचारी व मित्रपरिवार यांना दिले.
राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सह सचिव भारत घोगरे,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे.



