लोणी दि.११( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिन्नर येथील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्यु निकेशन विभागाने “कॉग्निझिया- २०२४ “टेक्निकल इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते केले होते . यामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे जिल्ह्य़ातील विविध तंत्रनिकेतन तसेच इंजिनिअरींग कॉलेज मधील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.अशी माहीती प्राचार्य डॉ. गणेश शिंदे यांनी दिली.
विद्याथ्यांनी प्रोजेक्ट, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तसेच पोस्टर प्रदर्शित केले. तसेच बॉक्स क्रिकेट व बिजीएमआय या दोन्ही खेळांचा समावेश होता.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक येथील शिवानंद इलेक्ट्रॉनिक ताञीक विभाग प्रमुख प्रा. बाळासाहेब निंबाळकर तसेच परीक्षक प्रा. हमीद अन्सारी, प्रा.शरद रोकडे, प्रा.प्रविण तांबे, प्रा.ऋषिकेश भालेराव यांनी काम पाहिले.विद्यार्थ्यांना प्रबोधन करतांना प्रत्येकाकडे सकात्मक आणि नकात्मकता असतेआपण फक्त सकात्मक दृष्टीकोणातून पुढे जावे असे प्रा. बाळासाहेब निंबाळकर यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी कॉग्निझिया- २०२४ मध्ये सहभाग घेऊन आपल्या ज्ञानात भर घालून आपले भविष्य उज्वल करावे असे प्राचार्य डाॅ. गणेश शिदे यांनी सांगितले.
विभाग प्रमुख प्रा.डॉ.राणा महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर प्रा.सोमनाथ लव्हाटे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.लिलाधर भामरे ,प्रा. अर्चना हटकर, प्रा.प्रशांत बिबवे,प्रा.तृप्ती वाबळे, सुमृती हासे व सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.