8.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

जागतिक महिला दिनानिमित्त नवी दिल्ली येथे ठाणे (नवी मुंबई)च्या समाजसेविका अनुजा साळवी यांना भारत भूषण पुरस्कार राष्ट्रीय उत्कृष्ठ महिला पुरस्कार प्रदान.

मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा ):- महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे डॉ. आदित्य पतकराव यूथ फाउंडेशन व मानवपरिवर्तन विकास व बहुउद्देशीय सेवा भावी संस्थे तर्फे आयोजित, राष्ट्रीय महिला संसद २०२४ भरवण्यात आली होती. देशभरातील १३८ कर्तृत्ववान महिलांचा राष्ट्रीय उत्कृष्ट महिला पुरस्काराने सम्मान करण्यात आला. 

कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या श्रीमती. रिंचेन लाम्हो, भारत सरकार तर्फे माँटेनेग्रो देशाच्या ऑनररी काउन्सुलेट डॉ. जाणीस दरबारी, भारत सरकारच्या अनुसूचित जाती आयोगाच्या माजी सदस्या श्रीमती अनुज बाला, भारत सरकारच्या अर्जुन अवॉर्डी श्रीमती नसरीन, भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचे सल्लागार सदस्य तसेच फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. आदित्य पतकराव, अभिनेत्री व मॉडल श्रीमती नुपूर मेहता व अनेक मान्यवर उपस्थित होते.

आलेल्या सर्व मान्यवरानी सर्व सन्मानित महिलांचे व भारत भूषण पुरस्कार्थीचे अभिनंदन केले तसेच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे शिस्तप्रिय आयोजन केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजक डॉ. आदित्य युथ फाउंडेशन चे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाची संगता करताना डॉ. आदित्य पतकराव यांनी देशभरातील सर्व महिलांनी पुढे येऊन आपल्या देशासाठी असेच योगदान करावे व देशाच्या प्रगतीला हाथभार लावावा अशी आशा व्यक्त केली.

राष्ट्रीय महिला संसद २०२४ च्या कार्यक्रमादरम्यान पुणे येथील श्री. अमोल टेंभरे व श्री. नामदेव तौर यांचा सामाजिक कार्यासाठी भारत भूषण पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात आला.

तसेच राष्ट्रीय महिला उत्कृष्ट पुरस्काराने महाराष्ट्रातील खालील महिलांचा सन्मान करण्यात आला

१) श्रीमती. अनुजा साळवी- सामाजिक कार्य (मुंबई)

२) श्रीमती. सुलोचना नामदेव माळी – उत्कृष्ठ शासकीय नोकरी ( सांगली) 

३) श्रीमती. कविता भावलाल साळुंखे – उत्कृष्ठ महाराष्ट्र पोलीस ( छ. संभाजी नगर) 

४) श्रीमती. जयश्री राधाकिसन शिंदे – सामाजिक कार्य (छ. संभाजी नगर) 

५.) डॉ. ज्योत्सना रामराव अड्डे – दंत क्षेत्रातील पेटंट होल्डर ( अंबाजोगाई) 

६) डॉ. भाग्यश्री कुलकर्णी – सामाजिक कार्य ( धुळे) 

७) श्रीमती अर्चना वैद्य – व्ही. जे . एन. टी सेल विशेष कार्य तसेच सामाजिक कार्य (पुणे) 

तसेच विशेष पुरस्कार्थी म्हणून

१) श्रीमती कामाक्षी शर्मा – सायबर सेक्युरेटी ऍक्टिविस्ट ( नवी दिल्ली) 

२) श्रीमती अर्चना राव – दाक्ष्यानात्य अभिनेत्री ( बेंगलोर) 

आदींचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!