10.3 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

संजय गांधी निराधार योजनेचे ३ कोटी १५ लाख खात्यात वर्ग – अमोल खताळ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे यश

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-          राज्‍य सरकार व केंद्र सरकारच्या माध्‍यमातून सुरु असलेल्‍या संजय गांधी निराधार योजना अंतर्गत तालुक्‍यातील लाभार्थ्‍यांना जानेवारी व फेब्रुवारी २०२४ अखेर ३ कोटी १५ लाख ८ हजार १०० रुपये महसूलमंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार डॉ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या विशेष प्रयत्‍नांमुळे लाभार्थी खात्‍यात वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती संजय गांधी निराधार योजना संगमनेर अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली आहे.

सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा निवृत्‍ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय दिव्‍यांग निवृत्‍ती वेतन योजना, राष्‍ट्रीय कुटूंब लाभ योजना अशा योजनांचा यामध्‍ये समावेश आहे.

माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४८ लाभार्थ्याना १ कोटी ५५ लाख ७३ हजार रुपये, माहे फेब्रुवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती ५६० लाभार्थ्याना ८ लाख ३२ हजार ५०० रुपये, माहे फेब्रुवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २२८ लाभार्थ्यांना ३ लाख ३९ हजार रुपये , माहे फेब्रुवारी २०२४ चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण ५३४६ लाभार्थ्यांना 80 लाख १९ हजार रुपये, माहे फेब्रुवारी २०२४ चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती ७०१ लाभार्थ्यांना १० लाख ५१ हजार ५०० रुपये, माहे फेब्रुवारी २०२४ चे श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२५ लाभार्थ्यांना ४ लाख ८७ हजार ५०० रुपये व माहे फेब्रुवारी २०२४ चे श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४०५३ लाभार्थ्यांना ५२ लाख ३५ हजार ६०० रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आले आहे.

लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्याशी, नामदार विखे पाटील जनसंपर्क कार्यालय अथवा भाजप कार्यालय, संगमनेर येथे संपर्क साधावा असे आव्हान अमोल खताळ पाटील यांनी केले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!