कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा ):- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीच्या नृत्य कलाकारांनी स्पोर्टस् एरोबिक्स फिटनेस असोसिएशनच्या वतीने पुणे येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय हिफहॉफ नृत्य स्पर्धेत राज्यभरातील एकुण ३५ स्पर्धक शाळांमधून प्रथम क्रमांक मिळवुन बाजी मारली. आता हे कलाकार एप्रिल महिन्यात राष्ट्रीय स्पर्धेसाठी जम्मु काश्मीरला जाणार आहे. अशा प्रकारे संजीवनी अकॅडमी एका पाठोपाठ एक कीर्तिमान प्रस्थापित करीत असल्याची माहिती संजीवनी अकॅडमीच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या व्यवस्थापकिय संचालिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतुन शैक्षणिक बाबी परीपुर्ण करून विध्यार्थ्यांमधिल सुप्त गुण ओळखुन त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. यासाठी अतिरीक्त उपक्रमांसाठी राष्ट्रीय निपुणता धारक कोचेसची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा परीपाक म्हणजे बहुतांशी स्पर्धेत संजीवनी अकॅडमीचे विध्यार्थी जिंकणारच, असे समिकरण बनले आहे.
पुणे येथील समुह नृत्य स्पर्धेत संजीवनीचे नृत्य कलाकार दर्शिनी भूषण समददिया, अनया किशोर पाटील, अन्व्रीता गौतम, अन्वी विजय जोर्वेकर, वेदश्री सिध्दार्थ शेळके, काव्या सुरेश ठक्कर, तनिष्क भारत आढाव, स्वयम राकेश भांभारे, रूत्वा योगेश वालझडे, आयुष संजय भनसाळी, अर्चिता मंदार पहाडे, आराध्या स्नेहलकुमार फलटणकर, वेदांत आशिष रोहमारे, आर्या पंकज जाधव व निष्का दिपक वाल्लीरामानी या बाल कलाकारांनी आपल्या नृत्य आविष्काराचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या सर्व कलाकारांचा डॉ. मनाली कोल्हे यांनी सत्कार करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्या प्रिती राय व नृत्य दिग्दर्शक आकाश घायवट उपस्थित होते.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व विजेत्या कलाकारांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.