टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा ):—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील भूमीपूत्र शिवम पटारे याने नूकत्याच पार पडलेल्या प्रो—कबड्डी स्पर्धेत हरियाना स्टीलर्स कडून उत्कृष्ठ खेळ करत आपल्या संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. अशा अष्टपैलू खेळाडूची आगामी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड होणे अपेक्षीत होते. मात्र असे असताना ही शिवम पटारे यांना निवड समितीकडून वगळ्यात आल्याने त्याच्यावर अन्याय झाला असल्याच्या प्रतिक्रिया कबड्डी प्रेमींकडून उमटू लागल्या आहे.
अनेक वर्षापासून कबड्डी खेळात अष्टपैलू कामगिरी करणार्या शिवम पटारे याने अनेक स्पर्धा जिंकल्या असून अनेक पदकाने त्याला सन्मानीत करण्यात आले आहे. खेलो इंडीयासह विविध पातळीवरील कबड्डी सामन्यात शिवमने दमदार कामगिरी केली आहे.
नूकत्याच संपन्न झालेल्या व अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या प्रो—कबड्डी स्पर्धेत तब्बल तीन महिने हरियाना स्टीलर्स या संघासाठी उत्कृष्ठ चढाई पटूसह अष्टपैलू कामगिरी शिवम पटारे याने पार पाडली. आपल्या खेळाच्या जोरावर व सहकार्यांच्या साथीने शिवमने हरियाना स्टीलर्सला उपविजेतेपद मिळवून दिले. अशा हरहुन्नरी खेळाडूची आगामी होवू घातलेल्या राष्र्टीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड होणे अपेक्षीत होते. या स्पर्धेसाठी यु मुम्बा कडून प्रो—कबड्डी खेळणार्या प्रणय राणे यांच्यावरही निवड समितीकडून अन्याय करण्यात आला होता. मात्र एका दैनीकाने आवाज उठविल्याने राणे याची निवड झाली. मात्र शिवम याच्यावर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया कबड्डी प्रेमींकडून उमटू लागल्या आहे. कुठल्या निकषावर निवड समिती खेळाडूंची निवड करते याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवम सारखा उत्कृष्ठ कबड्डीपटू या निवडीपासून का वंचित राहीला? निवड समितीकडून वशीलेबाजी तर होत नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न कबड्डी प्रेमींकडून शिवमच्या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. शिवमचा उत्कृष्ठ कबड्डी खेळाचा विचार करता निवड समितीने आगामी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी त्याची निवड करावी अशी माफक अपेक्षा कबड्डी प्रेमींकडून केली जात आहे.
शिवम पटारे अहमदनगरचा व स्पर्धा पण अहमदनगर मध्ये तरीही स्वतःच्या जिल्ह्यातील एका उत्कृष्ट खेळाडूच निवड समितीला विसर कसा पडला .या विसराच नेमक कारण काय? असा प्रश्न कबड्डी प्रेमीनी उपस्थीत केला आहे. अश्या उत्कृष्ट खेळाडूला डावलून तुम्ही नेमक कश्या खेळाडूना घेऊन स्पर्धेत राज्याच नाव देश पातळीवर नेणार ? एकूण या निवड समितीवरच प्रश्न चिन्ह उभे राहत आहे.