राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-गुहा येथील प्रेरणा विविध कार्यकारी सोसायटीला राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली NCDC [सहकार मंत्रालय ] एक्सलन्स अँड मेरिट पुरस्कार २०२३ ला सन्मानित करण्यात आला . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे उपाध्यक्ष अशोकराव उर्हे व संचालक यांनी आज पुणे येथे हा पुरस्कार स्वीकारला.
दर २ वर्षांनी राष्ट्रीय सहकारी विकास निगम सहकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने गुणवत्तेवर आधारित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते .वैमनीकाम च्या संचालिका डॉ. हेमा यादव यांच्या हस्ते हा पुरस्कार आज पुणे येथे अतिरिक्त सहकार आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर साहेब याचे हस्ते प्रदान करण्यात आला .वैमनीकाम च्या संचालिक डॉ . हेमा यादव .एनसीडीसी चे विभागीय संचालक कर्नल विनीत नारायण जाधव साहेब यावेळी उपस्थिती होते. .
२५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असा या पुरस्काराचा स्वरूप आहे प्रेरणा विविध कार्यकारी सोसायटी ना सभासदाचा विकासात केलेल्या कामाच्या अहवालावर व ताळेबंदाच्या आधारावर मेरिटवर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मा. खा. प्रसादराव तनपुरे साहेब . आ प्राजक्त दादा तनपुरे .मा.आ. पांडुरंग अभंग साहेब. कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन अरुण साहेब तनपुरे यांनी अभिनंदन केले