राहुरी( प्रतिनिधी ):- राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी अरुण तनपुरे तसेच उप सभापती पदी गोरक्षनाथ तुकाराम पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीचा कार्यक्रम होताच कार्यकर्त्यांकडुन जल्लोष करत फटाक्यांची अतिषबाजी करून फुलांची उधळण करण्यात आली.
राहुरी कृषी बाजार समिती सभापती पदी अरुण तनपुरे, उपसभापती गोरक्षनाथ पवार
आज सकाळी राहुरी येथील बाजार समितीच्या कार्यालयात निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अरुण बाबुराव तनपुरे यांच्या अर्जावर सुचक म्हणून दत्तात्रय कवाने तर अनुमोदन म्हणून बाळासाहेब खुळे यांनी स्वाक्षरी केली.
.तर उपसभापती पदासाठी गोरक्षनाथ तुकाराम पवार यांच्या अर्जावर सुचक म्हणून दत्तात्रय शेळके तर अनुमोदन म्हणून महेश पानसरे यांची स्वाक्षरी केली. नंतर बाजार समितीच्या सभापती व उप सभापती पदाची निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप रुद्राक्ष व सहाय्यक म्हणून जरे यांनी काम पाहिले.त्यानंतर बाजार समितीच्या आवारातील डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या पुतळ्यास सभापती अरूण तनपुरे तसेच सर्व नवनियुक्त संचालकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक सुरेश बाफना, दत्तात्रय कवाने, सुनिता खेवरे, सत्यजित कदम, शामराव निमसे, दत्तात्रय शेळके, रखमाजी जाधव, मंगेश गाडे, शारदा आढाव, बाळासाहेब खुळे, मारूती हारदे, चंद्रकांत पानसंबळ, मधुकर पवार, महेश पानसरे, रामदास बाचकर, शोभा डुक्रे हे उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापती अरुण तनपुरे व उप सभापती गोरक्षनाथ पवार यांचा मल्टीस्टेट फेडरेशचे अध्यक्ष सुरेश शेठ वाबळे, प्रभाकर पानसंबळ, डॉ. तनपुरे कारखान्याचे मा. संचालक विजय डौले, आदिंनी सत्कार केला.



