22.7 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

सावरगावतळाला वाजत गाजत काढली मुळगंगा माता हनुमान मूर्तीची मिरवणूक महंत अरुणाथगिरीजी महाराजांच्या शुभहस्ते उद्या होणार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-राजस्थानहुन आणलेल्या मुळगंगा माता व हनुमान मूर्तीची तसेच मंदिर कळशाची गावाच्या शिवेपासून गावापर्यंत भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाचा गजर करत टाळमृदुंगाच्या गजरामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली . या दोन्ही मूर्तींची प्राणप्रतिष्ठा श्रीरामपूर तालुक्या तील भामाठाण अडबंगनाथ आश्रमाचे महंत अरुणाथगिरी महाराज यांच्या हस्त उद्या रविवारी १७ मार्च रोजी होणार आहे.

संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील मळगंगा माता विठ्ठल रुक्मिणी हनुमान ही सर्व मंदिरे एकाच छताखाली आणण्यासाठी ग्रामस्थांनी लाखो रुपयां च्या लोकवर्गणीतून गावात आकर्षक असे मंदिर साकारले आहे.

या मंदिरात नव्याने राजस्थानवरून आणले ल्या मुळगंगा माता व हनुमनाची मूर्ती टाळमृदंगाच्या अन पखवादाच्या गजरात गुरुवारी सायं काळी वाजत गाजत भक्तिमय वातावरणामध्ये मिरवणूक सुरू झाली .या मिरवणुकीच्या अग्रभागी हिरव्या साड्या परिधान केलेल्या कलश व तुळशी वृंदावन धारक महिला तसेच भजन म्हणारे पुरुष मंडळी सहभागी झाले होते .त्या पाठोपाठ सज विलेल्या रथात आचार्य डॉ रामकृष्णदास महाराज लहवितकर विराजमान झाले होते.

त्यापाठोपाठ मळगंगा माता आणि हनुमान मूर्ती तसेच डीजेच्या तालावर थिर कणारी तरुण-तरुणी या मिरवणुकीत सहभागी झाल्या झाले होते ठीकठिकाणी या मिरवणुकीचे सडा रांगोळ्या काढून स्वागत करण्यात आले होते . गावाच्या शिवे पासून निघालेली मिरवणूक संपूर्ण गावातून हरिनामाचा गजर करत मंदिरा पर्यंत पोहोचली. संगमनेर येथील पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी यांच्या हस्ते या मूर्तींची विधिवत पूजा करण्यात आली.

मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यात शुक्रवारी गावातील यजमान जोड्यांच्या हस्ते विधिवत होमहवन व पूजा करण्यात आली तसेच सायंकाळी सुनील महाराज मंगळापुरकर यांचे किर्तन झाले .शनिवारी आळंदीचे उत्तम महाराज बढे यांचे किर्तन होणार आहे. तसेच रविवारी सकाळी श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील अडबंगानाथ संस्थांचे महंत अरुणनाथगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मुळगंगा माता व हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारंभ होणार आहे.

.यावेळी आचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या किर्तननाने तसेच महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे. तरी या उत्सवामध्ये सावरगाव तळ व परिसरातील भाविक भक्तांनी तसेच बाहेरगावी सासरवासीन असलेल्या मुलींनी व नोकरी व्यवसाय निमित्ताने गेलेल्या सर्वांनीच या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावरगाव तळ ग्रामस्थ मंदिर समितीच्या वतीने वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!