राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा डॉ. बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मच्छिंद्र पा. तांबे यांचे चि. ॲड. विवेक तांबे यांचे केंद्र सरकारच्या नोटरी पब्लिकपदी निवड झाली ते अनेक वर्षापासून जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर व राहुरी न्यायालय येथे वकीली व्यवसाय करीत आहे तसेच विविध बँक, वित्तसंस्था व सामाजिक संघटना यावर कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी सन्मान केला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.