spot_img
spot_img

प्रवरेच्या कृषी संलग्नित महाविद्यालयांचे राष्ट्रीय परिसंवादमध्ये यश १३ विद्यार्थी ठरले विजेते

लोणी दि.२४ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक परिसंवादमध्ये लोणी येथिल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये पारितोषिके मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.करत १३ विद्यार्थी विजेते ठरले आहे.

सदरचा परिसंवाद लोणी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागाच्या वतीने आयोजित केलेला होता.यात प्रश्न मंजुषा, तोंडी व पोस्टर सादरीकरण इ. स्पर्धेमध्ये कृषी संलग्नित महाविद्यालयांचे विद्यार्थी रोहित पवार, रोहित वाकचौरे, अचल भराटे, किरण भुजबळ,प्रीती कासार, श्रावणी वाळुंज, साक्षी सातपुते, कल्याणी जाधव,श्रद्धा वडजे, मच्छीन्द्र वाघमोडे, नितीन पांडुळे, प्रतिक्षा नागवडे, शिवानी नागवडे इत्यादींनी पारितोषिके प्राप्त केली.

 सदर विद्यार्थ्यांना कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य डॉ. विशाल केदारी,प्राचार्य डॉ किरण गोंटे व समन्वक डॉ ज्योती झिरमिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील,संस्थेचे विश्वस्त माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, , संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे आदींनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!