पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेनच्या विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत ( एलिमेंटरी ) 100% यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेतील परीक्षेत बसलेले 30 विद्यार्थी विविध श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. ए श्रेणीत 04, बी श्रेणीत 01 तर सी श्रेणीमध्ये 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे सर्व विद्यार्थी इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये शिकत आहेत या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पिंपरी जलसेनची जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते.
शाळेचा नवोदय, स्कॉलरशिप निकाल देखील जिल्ह्यात उत्कृष्ठ असतो. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे शिक्षक श्रीम.रत्नमाला नरवडे, श्री.सतीश भालेकर, श्री.मल्हारी रेपाळे,श्री. जयप्रकाश साठे, श्रीम.शारदा तांबे, मुख्याध्यापक श्री. देवराम पिंपरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. संदिप अडसरे, विमा सल्लागार श्री. एकनाथ पोटे, पिंपरी जलसेन गावचे सरपंच श्री.सुरेश काळे, केंद्रप्रमुख श्री.दौलत येवले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. तबाजी केसकर, गटशिक्षणाधिकारी श्रीम. सिमाताई राणे यांनी अभिनंदन केले.
श्रेणी ए
श्रावणी मोरे, स्नेहल मोरे, प्रांजल भालेकर, आदिती वाव्हळ
श्रेणी बी
हर्षल शेळके
श्रेणी सी
वेदांत वाढवणे, साक्षी वाढवणे, श्रेया वाढवणे, तनिष्का घेमूड, हर्षाली रणदिवे, सार्थक काळे, ओम गायकवाड, अभिषेक हारदे, आदित्य शेळके, निशांत बढे, राजवर्धन करकंडे, पियूष धूमाळ, जयदीप गट, विरेन रसाळ, पियूष परांडे , आर्यन भगत , आर्यन जाधव, वेदांत मोरे, चैतन्य बढे, खुशी औटी, समीक्षा शेळके, अनुष्का सुपेकर, प्रांजल ठाणगे, उत्कर्षा भगत, ज्ञानेश्वरी घोरपडे