16.3 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

आज नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच देशभर अचारसंहिता लागू   महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार

दिल्ली (जनता आवाज वृत्तसेवा):- आज दुपारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार देशात १९ एप्रिल ते १ जून अशा ७ टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला मतमोजनी होईल. आज (शनिवारी) नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच देशभर अचारसंहिता लागू झाली आहे. 

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी राज्यात मतदान होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी नव्वी दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन १८ व्या लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

भारतात १७ व्या लोकसभेचा कार्यकाल १६ जून २०२४ ला संपतो आहे. त्यामुळे १७ जून नंतर देशात नवे सरकार स्थापन होईल.

महाराष्ट्रात कधी मतदान

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

4 जूनला लोकसभेचा निकाल

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!